अशी करा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक….

सध्या प्रत्येक जण शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असल्याचे आपल्याला दिसत आहे. गुंतवणूकदारासमोर या गुंतवणुकीचे बरेचशे मार्ग असतात. सध्या तरी शेअर्समध्ये गुंतवणूक हा सर्वांना लुभावताना दिसत आहे. त्यामधील प्रत्येकाची ज्याची त्याची एक स्ट्रॅटेजी असते.काही जणांना कमी दिवसांमध्ये जास्त पैसा कमवायचा असतो तर काही जण दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून अधिकाधिक नफा कमवण्याचा उद्देश ठेवून असतात. शेअर बाजारातील गुंतवणूक ही प्रत्यक्ष गुंतवणूक असते. यामध्ये आपण कंपनीचे शेअर्स म्हणजेच समभाग खरेदी करत असतो.

इक्विटी शेअर्स (Equity ) :-

शेअर बाजारातील गुंतवणूक करताना आपल्याला इक्विटी शेअर्स म्हणजे काय समजून घेणं फार गरजेचं आहे. शेअर्स म्हणजे कंपनीच्या मालकीचे भाग म्हणजे कंपनीच्या मालकीचा लहानात लहान एकक. शेअर्सलाच मराठीमध्ये समभाग असे देखील म्हणतात. यावरून आपल्या लक्षात येते की शेअर्स किंवा इक्विटी म्हणजे एकच आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा एकक म्हणजेच भाग खरेदी करता. म्हणजेच तेवढ्या भागाचे मूल्य तुम्ही कंपनीचे खरेदी करता.

शेअर मधील गुंतवणूक करण्याचे मार्ग :-

शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जे काही पर्याय उपलब्ध आहेत त्यासाठी काही आवश्यक गोष्टी आपल्याकडे असणे आवश्यक आहे. कंपनी जेव्हा पहिल्यांदाच बाजारामध्ये आपल्या कंपनी किस्सा विक्रीसाठी आणते तेव्हा त्यास आयपीओ असे म्हणतात पण त्यासाठी अर्ज करावा लागतो. आलेल्या अर्जाची संख्या व उपलब्ध शेअर्स यांची लॉटरी सिस्टीम पद्धतीने समभाग दिले जातात. हा आपण पहिला मार्ग बघितला तर दुसऱ्या मार्गामध्ये अगोदरच ज्या कंपन्या लिस्टेड झालेली आहेत त्या कंपनीचे शेअर्स आपण बाजारामधून प्रत्यक्षरीत्या खरेदी करू शकता. शेअर्स प्रत्यक्षरीत्या खरेदी करण्यासाठी आपल्याला खालील गोष्टींची आवश्यकता असते.

डिमॅट अकॉउंट :- डिमॅट म्हणजे डीमटेरियलाईज. ज्यामध्ये तुमचे शेअर्स डीमटेरियलाईज स्वरूपात ठेवले जातात.म्हणजे एकंदरीत डिजिटल स्वरूपात ठेवले जातात. जसं आपल्याला बँकेत बचत खाते किंवा चालू खाते उघडून आपण पैशांचे व्यवहार करतो. अगदी त्याचप्रमाणे शेअर्सचे खरेदी किंवा विक्री करण्यासाठी जे खाते असते त्याला डिमॅट अकाउंट असे म्हणतात. ज्या अकाउंटद्वारे तुमच्या शेअर्सच्या खरेदी विक्रीची सर्व व्यवहार नोंदीत केले जातात.तर हे खाते आपण कोणत्याही बँक जिथे या सुविधा दिल्या जातात किंवा ब्रोकिंग कंपन्या यांच्याकडे उघडू शकतो. शेअर्स हे प्रत्यक्षरीत्या आपल्याकडून खरेदी -विक्री करता येत नाही तर ते ब्रोकरच्या माध्यमातूनच करावी लागतात.

ट्रेडिंग अकाउंट :-

शेअर खरेदी विक्रीचे प्रत्यक्ष व्यवहार ज्या खात्यामध्ये होते त्यास ट्रेडिंग अकाउंट असे म्हणतात. बीएससी किंवा एन एस सी मध्ये नोंदणीकृत असलेल्या कुठल्याही ब्रोकरकडे हे अकाउंट उघडावे लागते.जिथे तुमचे डिमॅट अकाउंट शेअर्सच्या खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार नोंदीत केले जातात, तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये हे व्यवहार केले जातात.

गुंतवणूक कालावधी वरून गुंतवणुकीचे दोन प्रकार पडतात :-

1. Short Term investment :-

वरील शब्दावरूनच आपल्या लक्षात येईल की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजेच कमी कालावधी करता केलेली गुंतवणूक. यामध्ये कमी कालावधीसाठी शेअरची खरेदी- विक्री केली जाते. शेअर्सच्या दरामध्ये होणाऱ्या चढउताराचा फायदा घेण्याचा उद्देश यामध्ये असतो. अर्थातच कमी कालावधीत अधिक नफा कमवणे हा उद्देश या प्रकारच्या कमी कालावधीच्या गुंतवणुकीमध्ये केला जातो. या प्रकारच्या गुंतवणुकीला ट्रेडिंग किंवा या प्रकारचे व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना ट्रेडर असे म्हणतात. ज्यामध्ये त्याच दिवशी शेअर्स खरेदी करून त्याच दिवशी विकणे याला ट्रेडिंग म्हणतात. तर काही गुंतवणूकदार हे पुढील एक-दोन दिवसांमध्ये ही शेअर्स विकत असतात. अर्थातच या प्रकारची गुंतवणूक ही जोखमीची असू शकते. प्रकारचे व्यवहार करताना बाजारावर अगदी करडी नजर ठेवून असावे लागते. जसा कमी कालावधीत नफा होण्याचे उद्देश आपण बाळगून असतो त्याचप्रमाणे काही विरुद्ध गोष्टी घडल्यास कमी कालावधीत मोठा तोटा देखील घडू शकतो. प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये कमी कालावधीत अधिक नफा मिळण्याची शक्यता असली तरी या प्रकारची गुंतवणूक ही अधिक जोखमीची असते. राजकीय स्थिती, आर्थिक स्थिती, त्याचबरोबर सरकारचे वित्तीय धोरण या गोष्टींचा बाजारावर परिणाम होत असतो. पूर्ण वेळ शेअर्स बाजारामध्ये व्यवहार करणारे गुंतवणूकदार या प्रकारची गुंतवणूक करत असतात.

2. Long Term Investment :-

शब्दरचनेप्रमाणेच या प्रकारची गुंतवणूक ही दीर्घ कालावधीसाठी केली जाते. कंपन्यांचा नफा त्यांचे बाजारातील स्थान, यांचे ब्रँडिंग या आधारे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये देखील मूल्य वर्धन होत असते. ज्याचा फायदा हे दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार घेत असतात. या प्रकारची गुंतवणूक तुलनेने कमी जोखमीची असते. जसा आपण वर बघितलं की शॉर्ट टर्म इन्वेस्टमेंट करणारेना ट्रेडर म्हणतात याच प्रकारे कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना इन्वेस्टर असे म्हणतात. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना त्या शेअर्समध्ये लाभांश, बोनस शेअर, स्टॉक्स स्प्लीट होणे यासारखे फायदे मिळू शकतात. ज्यांच्याकडे कमी वेळ असतो व उद्योगधंद्यात गुंतवलेले नोकरी करणारे लोक या प्रकारची गुंतवणूक करतात जी त्यांच्यासाठी फायदेशीर पण असते. प्रकारची शेअर्समधील गुंतवणूक हे कित्येक वर्षासाठी केली जाते.

शेअर्समध्ये खरंच गुंतवणूक करावी का….?

विविध तज्ज्ञांच्या मतानुसार Equity- शेअर्समध्ये जर दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर ती फायद्याचे ठरू शकते. कारण गुंतवणुकीच्या इतर साधनांमध्ये जसे की बँक FD, KVP, PPF जिथे काही पुरवनिर्धारित व्याजदर मिळतो. जो तुलनेने कमी असतो. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की वर उल्लेख केलेल्या गुंतवणूक साधनामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नसतो किंवा जोखीम नसते. शेअर्समधील गुंतवणुकी जोखमीची असली तरी दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीमधून चांगला नफा मिळू शकतो. अर्थातच त्यामध्ये जोखीम देखील तितकीच जास्त असते. दीर्घ कालावधीसाठी शेअर्स मध्ये गुंतवणूक करताना बाजाराविषयी ज्ञान असणे गरजेचे आहे. आपण ज्या कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणार आहोत त्या कंपनीचे माहिती देखील आपल्याला असणे आवश्यक आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना कुठली काळजी घ्यावी.?

  • SEBI- Security and Exchange Board of India द्वारे रजिस्टर असलेल्या ब्रोकर कंपनी सोबत व्यवहार करावा.
  • विविध सल्लागारी Stock Advosory कंपन्या द्वारा काही वेळा आपल्याला शेअरच्या खरेदी विक्रीसाठी सल्ले दिले जातात तेव्हा स्वतःच्या अभ्यासाने निर्णय घ्यावा.
  • आपण दैनंदिन केलेल्या शेअर्सच्या व्यवहाराची आपले ज्या कंपनीकडे डिमॅट खाते आहे त्यांच्याकडून आपल्याला रोज व्यवहारातून जी कॉन्ट्रॅक्ट नोट मिळते त्याची आपण केलेले व्यवहाराशी पुष्टी करावी.
  • कोणतीही शेअर्स मधील गुंतवणूक करण्याआधी त्याबद्दलच्या जोखमीची माहिती करून घ्या
  • तुमच्याकडे असलेल्या रकमेपैकी काही ठराविक रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक करा कारण शेअर बाजारातील गुंतवणूक ही पूर्णपणे बाजारातील चढ उतारावर व इतर घटकावर अवलंबून असते त्यामुळे तुमच्या जवळील उपलब्ध भांडवलावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
  • आपल्या डिमॅट खात्यावरील सर्व व्यवहाराची नियमित पडताळणी करावी
  • मित्रांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करताना स्वतःचा अभ्यास करा.
  • SEBI कडे नोंदणी नसलेल्या ब्रोकर कंपनीशी कुठलाही व्यवहार टाळावा ज्यामुळे धोका होण्याची शक्यता असते
  • खूप मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी अवास्तव प्रमाणात गुंतवणूक करणे टाळावे.
  • टीव्ही चॅनल्स यूट्यूबर यांच्यामार्फत दिल्या गेलेल्या शेअर्स खरेदीच्या – विक्रीच्या संदर्भात स्वविवेकाचा वापर करून निर्णय घ्यावा.

शेअर्समधील नफ्यावर कर लागतो का?

शेअर्समधील गुंतवणूक ही मधून जो नफा प्राप्त होतो त्यावर जो कर आकारला जातो त्यास कॅपिटल गेन्स टॅक्स असे म्हणतात. याचे दोन प्रकार आहेत.

STCG – Short term capital gains tax कमी कालावधी साठी म्हणजेच एक वर्षाच्या आतील शेअर्सची विक्री केल्यानंतर नफा प्राप्त होतो त्यावर जोकर आकाराचा तो त्यास शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स असे म्हणतात सदर सध्या 15% इतका आहे. हा कर तेव्हाच आकारला जातो जेव्हा तुमचा नफा हा एक लाखाच्या पेक्षा जास्त असतो.

LTCG- Long term capital gains tax जेव्हा एखाद्या शेअरची तुम्ही खरेदी करून बारा महिने पेक्षा जास्त कालावधी नंतर त्या शेअर्सची तुम्ही विक्री करून मिळालेल्या नफा हा जर एक लाखापेक्षा जास्त असेल तर त्यावर एलटीसीजी म्हणजेच लॉन्ग टर्म कॅपिटल गेम्स टॅक्स नावाचा कर आकारला जातो. या कराचा दर हा 10 % टक्के इतका आहे.

याशिवाय दैनंदिन शेअर बाजारातील इंट्राडे ट्रेडिंग वरील व्यवहारावर STT security transaction tax हा कर आकारला जातो ज्याचा दर 0.01% इतका आहे जो तुमच्या पूर्ण व्यवहारावर आकारला जातो.

अशाप्रकारे शेअर बाजारातील गुंतवणूक काही उत्तम पर्याय असू शकतो. परंतु हे देखील ध्यानात घेतले पाहिजे की शेअर बाजारामधील गुंतवणूक ही पूर्णपणे बाजाराच्या जोखमीच्या आधीन आहे.

(Disclaimer :- आम्ही व्यावसायिक किंवा sebi रजिस्टर गुंतवणूक सल्लागार नसून वरील लेखातील मते ही केवळ अर्थ साक्षरतेच्या दृष्टिकोनातून दिलेली आहेत)

Leave a Comment