ज्यांच्याकडे रेशन पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नाहीये अशांनी सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजेच स्वतःचं स्व – घोषणापत्र सबमिट करायचे आहे ज्यामध्ये आर्थिक वर्ष व संबंधित आर्थिक वर्षांमधील तुमचे उत्पन्न दिलेले असते. व ही सर्व माहिती तुम्ही स्वतः तुमच्या जबाबदारीवर दिलेली असते.म्हणजे एक प्रकारचे शपथपत्रच आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे ते सेल्फ सर्टिफिकेशन किंवा स्वयंघोषणापत्र. आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेले आहे की, तुम्ही कुठल्याही लाभापासून वंचित राहणार नाही सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरणे चालू असून त्यासाठी विविध प्रकारची कागदपत्र सबमिट करताना बऱ्याच जणांना अडचण येत आहे. कुणाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसल्यामुळे त्याचबरोबर उत्पन्न प्रमाणपत्र दाखला वेळेत न मिळणे यामुळे ते हा फॉर्म भरण्यापासून वंचित राहतील याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्यांना हा लाभ मिळण्याची शक्यता नसणार आहे. त्यामुळे एका सभेमध्ये बोलताना माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी असे सांगितले आहे की ज्यांच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा त्या ऐवजी पिवळे किंवा केसरी राशन कार्ड नसेल तर त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन भरून द्यायचा आहे तर सेल्फ म्हणजे स्वयंघोषणापत्र यामध्ये पुढील बाबींचा समावेश असेल.
तुमचे नाव , वय, व्यवसाय, वडिलांचे नाव त्यानंतर अर्जदाराचा पूर्ण पत्ता त्यानंतर सदरील अर्जदाराचे सर्व साधनापासून एक / तीन वर्षाचे उत्पन्न प्रत्येक आर्थिक वर्षातील एक किंवा तीन याप्रमाणे असेल त्यानंतर उत्पन्नाचा स्त्रोत ज्यामध्ये शेती कृषी उद्योग दुग्ध व्यवसाय शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न अन्य मजुरी अन्य व्यवसाय व उद्योग शेती व्यतिरिक्त अन्य स्थावर मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न ज्यामध्ये नोकरी सेवानिवृत्ती वेतन मानधन इत्यादी मासिक उत्पन्नापासूनचे वार्षिक उत्पन्न त्यानंतर अन्य उत्पन्नाच्या साधनांपासून मिळणारे वार्षिक उत्पन्न या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहून तुम्हाला पूर्णपणे कायद्याच्या अधीन राहून सर्व खरी माहिती यामध्ये भरायची आहे, यामध्ये जर माहिती खोटी किंवा चुकीची भरली तर आपण कायदेशीर कारवाईस पात्र असाल याची जाणीव असणे देखील गरजेचे आहे. व त्यानंतर तुमचा सही त्यावर करायची आहे. अशा इत्यादी गोष्टी या स्वघोषणा पत्रामध्ये मूलभूत होतात.
तर अशाप्रकारे हे जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये अर्ज करताना ज्यांच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नाहीये किंवा ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही अशांनी पूर्ण माहिती भरून व हे सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजेच स्वघोषणापत्र भरून आपण ऑनलाईन पद्धतीने माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत असताना उत्पन्न प्रमाणपत्राच्या ठिकाणी अपलोड केली तरी आपला अर्ज बाद होणार नाही अशी माहिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काल एका सभेत बोलताना दिलेली आहे. सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे स्वघोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा