SME चा जर फुल फॉर्म बघितला तर त्याचा अर्थ होतो स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस म्हणजेच लघु आणि मध्यम उद्योग. जेव्हा या श्रेणीतील कंपन्यांचा आयपीओ येतो त्यास एसएमई SME आयपीओ असे म्हणतात. जेव्हा एखाद्या कंपनीची वार्षिक उलाढाल ही 100 कोटी पेक्षा जास्त असते तेव्हा ती स्मॉल कॅप कंपनी असते. व ज्यावेळी एखाद्या कंपनीची वार्षिक उलाढाल यापेक्षाही कमी असते त्या कंपन्यांना एसएमएस श्रेणीमध्ये समावेश होतो. जेव्हा या कंपन्यांचा आयपीओ येतो त्यालाच आपल्याला एसएमईआयपीओ असे म्हणतात. जेव्हा मेन लाईन आयपीओ येतात ते बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतात किंवा सूचीबद्ध होतात असे आपण म्हणू शकतो. पण जेव्हा या SME श्रेणीतील आयपीओ बाजारात येतात तेव्हा त्यांची लिस्टिंग ही बीएसईएसएमई किंवा एनएससी इमर्जिंग म्हणजेच ज्या नवनवीन कंपन्या व छोट्या कंपन्या येतात. त्या या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होतात. जेव्हा एखाद्या मेन लाईन कंपन्यांचा आयपीओ येतो त्यांची लॉट size देखील कमी असते.म्हणजेच रिटेल इन्वेस्टर साठी तेरा ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान त्यांची इन्व्हेस्टमेंट कमीत कमी असते. अर्थातच या प्रकारच्या आयपीओ मधून मिळणारा नफा देखील कमीच असतो व तोटा जर झाला तर तो देखील एका मर्यादित होण्याची शक्यता असते . याउलट एसएमई प्रकारच्या आयपीओ मध्ये मात्र लॉट साइज ही खूप मोठी असते म्हणजेच किमान एक लाख रुपये व त्यापेक्षा जास्त इतक्या लॉट साईजचे शेअर्स आपल्याला घ्यावे लागतात. म्हणजे सहाजिकच त्यामधून मिळणारा नफा किंवा तोटा हा जास्तच होतो म्हणजे नफा झाला तोही जास्त होतो व तोटा झाला तर तोही जास्त होण्याची शक्यता असते. जेव्हा मेन लाईन कंपन्यांचा आयपीओ येतो तेव्हा त्याचा प्राईस बँड हा हा फिक्स नसतो म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या मेनबोर्ड आयपीओ ची किंमत आपण 100 ते 110 या दरम्यान असते असा आपण पाहतो म्हणजे यापैकी कुठलेही किमतीला आपण अप्लाय करू शकतो. पण एसएमई प्रकारच्या आयपीओ मध्ये मात्र त्यांच्या शेअर्सची किंमत ही बऱ्याचदा फिक्स असते. एसएमई प्रकारच्या आयपीओ मध्ये लॉस जर झाला तर खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हा या मधला एक तोटा आहे अस आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर या प्रकारच्या आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यात दुसरा मोठा धोका म्हणजे या प्रकारच्या आयपीओ चे जे शेअर्स असतात ते एक-दोन असे आपण विकू शकत नाहीत म्हणजे ते पूर्ण लॉट मध्ये विकावे लागतात म्हणजे विकणारा सुद्धा लॉटमध्येच विकतो आणि घेणारा सुद्धा लॉटमध्ये त्याला घ्यावे लागतात. जसे की मेन लाईन आयपीओ मध्ये आपण एक किंवा त्यापेक्षा जास्त शेअर्स आपण विकू शकतो. परंतु एसएमई प्रकारच्या आयपीओ मध्ये मात्र जी लॉट साइज फिक्स असते उदाहरणार्थ दोन हजार शेअर्स 3000 शेअर्स या प्रकारचे लोट साइज ही फिक्स असते.
जेव्हा एखाद्या चांगल्या प्रकारच्या कंपनीचा SME श्रेणीतला आयपीओ येतो त्यामध्ये खूप चांगला नफा होण्याची शक्यता असते. परंतु सर्वसाधारण किंवा खराब कंपनीचा एसएमईआयपीओ असेल तर त्यामध्ये आपले पूर्ण पैसे बुडण्याची शक्यता जास्त असते. या प्रकारच्या कंपनीचा दुसरा फायदा म्हणजे या प्रकारच्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणुक ही मोठ्या प्रमाणात रिटर्न्स देण्याची शक्यता असते कारण ह्या प्रकारची कंपनी ही तिच्या परफॉर्मन्स नुसार एखाद्या वेळेस स्मॉल कॅप त्यानंतर मिडकॅप व त्यानंतर एखाद्या वेळेस लार्ज कॅप कंपनीमध्ये देखील त्या कंपनीचा समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे सर्व त्या कंपनीच्या परफॉर्मन्सवर व क्वालिटीवर अवलंबून आहे. बरेचसे व्हॅल्यू इन्वेस्टर जे आहेत ते अशाच प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून बऱ्याचदा मल्टिब्लॉगर रिटर्न्स मिळून मोठा नफा कमवण्याची उदाहरणे आपण पाहतोच.
या SME IPO ला apply कसा करावा?
जेव्हा आपण एसएमईआयपीओ मध्ये अप्लाय करतो तेव्हा प्रत्येक ब्रोकर ही सुविधा देईल असे नाही.काही ब्रोकर कंपन्यांच्या एप्लीकेशन मध्ये एसएमई प्रकारची आयपीओ प्रत्येक ब्रोकरकडे दिसत नाहीत. अर्थातच ज्या प्रकारचे ब्रोकर ही सुविधा उपलब्ध करून देतात त्यांच्याकडे जर तुमचे डिमॅट अकाउंट असेल तर त्यांच्या एप्लीकेशन मधून आपण या प्रकारचे आयपीओला मेनबोर्ड प्रमाणेच apply करू शकतो म्हणजेच, त्या ब्रोकरच्या एप्लीकेशन मधून ज्या आयपीओ लिस्ट आहेत त्यामधील आपल्याला ज्या SME ipo ला अप्लाय करायचा आहे त्यावर क्लिक करून आपण पूर्ण लॉट साइज व आपल्या यूपीआय id टाकून आपण अप्लाय करू शकतो. त्यानंतर आपण जो यूपीआय दिलेला आहे त्याच आपल्या पेमेंट एप्लीकेशन मध्ये आपल्याला एक नोटिफिकेशन येईल जे त्या SME आयपीओची जी अमाऊंट आहे ती ब्लॉक करण्यासाठी असेल त्यावर क्लिक करून आपण आपला यूपीआय पिन टाकून त्या ipo ला अप्लाय करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतो.
त्यानंतर दुसरी जी प्रक्रिया आहे ती म्हणजे इंटरनेट बँकिंग. आपण इंटरनेट बँकिंग मधून देखील आपण या प्रकारच्या एसएमईआयपीओला अप्लाय करू शकतो. अर्थातच ही प्रक्रिया देखील मेनबोर्डआयपिओ प्रमाणेच आहे. आपण आपल्या नेट बँकिंग मध्ये लॉगिन केल्यानंतर तिथे एएसबीए या हा ऑप्शन असेल एएसबीए म्हणजेच एप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट यावर क्लिक करून आपण त्यामध्ये उपलब्ध यादीमध्ये जो आपल्याला अप्लाय करायचा आहे असा जो आयपीओ आहे त्यावर क्लिक करून पूर्ण आपल्या डिमॅट अकाउंट चे डिटेल्स टाकायचे आहेत त्यानंतर आपला किती शेअर्सच्या लॉट साठी अप्लाय करायचा आहे ते पूर्ण भरून आपण अप्लाय करू शकतो. इतकी ही प्रक्रिया सोपी आहे.
जेव्हा आपण एखाद्या IPO ला अप्लाय करतो तर वरील दोन्ही प्रकार मध्ये करताना दुसरी जी प्रक्रिया आहे त्याचा फायदा जास्त आहे तो म्हणजे जेव्हा यामध्ये जी अमाऊंट ब्लॉक असते ती आपल्याच खात्यामध्ये असते व ती देण्याची जबाबदारी त्या संबंधित बँकेचे असते जिथे आपल्या खात असते त्यामुळे इथे आपली अमाऊंट जर एखाद्या वेळेस आपल्याला आयपीओ नाही मिळाला व ती ब्लॉक असेल व ठराविक कालावधीमध्ये रिलीज झालेली नसेल तेव्हा ती रिलीज करण्याची जबाबदारी त्या आपल्याच बँकेची असते व ही प्रक्रिया सोपी आहे वरील UPI app द्वारे प्रकारे मात्र आयपीओ न मिळण्याचे स्थितीत जर आपली अमाऊंट लवकर रिलीज झाली नाही तेव्हा मात्र ती रिलीज करण्याची जबाबदारी त्या यूपीआय एप्लीकेशनची असते. अर्थातच ही प्रक्रिया थोडीशी किचकट आहे.
(Disclaimer : शेअर बाजारामधील गुंतवणूक ही धोक्याच्या अधीन असते कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.)