OLA Electric IPO विषयी जाणून घ्या सर्व काही, ही आहे शेवटची तारीख

तर आज आपण या ब्लॉगमध्ये सर्वाधिक चर्चित असलेल्या Ola Electric Mobility Limited या कंपनीच्या आयपीओ बद्दल माहिती घेणार आहोत. आणि या आयपीओची बरेच जण बऱ्याच दिवसापासून वाट बघत आहेत.त्याच कारण म्हणजे या कंपनीच्या business model विषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे. तर आज आपण या कंपनीच्या विषयीची त्याचबरोबर कंपनीची वित्तीय कामगिरी आहे म्हणजे कंपनी नफ्यात आहे किंवा तोट्यात आहे कंपनीचे उत्पन्न किती आहे त्याचबरोबर कंपनीचे फंडामेंटल त्यानंतर शेअर्सची किंमत या सर्व गोष्टी आपण या आयपीओ बद्दल बघणार आहोत.
तर या कंपनीच्या GMP बद्दल बोलायचं तर सध्या 16 ते 17 रुपये इतका GMP सध्या प्रतिशर इतका दाखवत आहे अर्थात जीएमपी हे बाजारानुसार कमी जास्त होत असते त्याचबरोबर इतर बातम्यांचा व इतर गोष्टींचा शेअर बाजारावर जो परिणाम होतो त्यावरच जी एम टी मध्ये चढउतार होणार असतो. जी एम पी नुसार जरी आयपीओ बद्दल बोलायचं झालं तर सध्या तरी GMP – म्हणजेच ग्रे मार्केट प्रीमियम हा सध्या सकारात्मक दाखवत आहे.

कंपनी बद्दल : कंपनीची स्थापना ही 2017 ची आहे.तर या कंपनीने तर 2017 पासूनच या कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकलच्या क्षेत्रामध्ये उत्पादन घेण्यासाठी सुरुवात केली. तर 2021 मध्ये या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स या कंपनीने लॉन्च केले ज्यामध्ये ओला S1 pro scooters ई. इलेक्ट्रिक स्कूटर बरोबरच ही कंपनी स्कूटर्स त्यानंतर इलेक्ट्रिक बॅटरी पॅक असतील, त्याचबरोबर मोटर्स, त्याचबरोबर वाहनांची फ्रेम्स आहेत ई उत्पादने बनवण्याचे काम ही कंपनी करते. त्याचबरोबर ओला इलेक्ट्रिक या कंपनी मार्फत भविष्यामध्ये हे कंपनी इलेक्ट्रिक मोटर बाईक च्या क्षेत्रात देखील ही कंपनी उतरणार आहे त्याचबरोबर ola इलेक्ट्रिक कार उत्पादनावर देखील ही कंपनी काम करण्याची शक्यता भविष्यामध्ये आहे. पण सध्या तरी ही कंपनी फक्त इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादनातच आहे. इलेक्ट्रिक scooters क्षेत्रात जर मार्केट शेअर बघितला तर 35% मार्केट शेअर या कंपनीचा आहे. जवळपास तीन लाख 29 हजार युनिट या कंपनीने 31 मार्च 2024 पर्यंत विकल्याची उत्तम कामगिरी केली आहे. यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे ओलाची विक्री कामगिरी ही खूप छान आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत या कंपनीचे 870 एक्सपिरीयन्स सेंटर तर जवळपास 431 हे सर्विस सेंटर पूर्ण भारतामध्ये आहेत. तर जेवढे काही या कंपनीचे शोरूम्स आहेत ते कंपनीचे स्वतःचे आहेत. हे या कंपनीच्या विशेष वैशिष्ट्यही सांगता येईल.

तर चला तर आता कंपनीच्या वित्तीय कामगिरीबद्दल बघूया कंपनीच्या असेट्स विषयी जर बघायचं झालं तर 31 मार्च 2023 मध्ये 5573 कोटी 17 लाख इतके होते. तर 31 मार्च 2024 रोजी 7735 कोटी 41 लाख अशी वाढ त्यामध्ये होताना दिसत आहे. जर कंपनीचा महसूल बघितला तर 31 मार्च 2023 ला 2782 कोटी 70 लाख इतका असून 31 मार्च 2024 पर्यंत त्यामध्ये 5243 कोटी 27 लाख इतकी वाढ होताना दिसत आहे. 2022 पासून जर 2024 तुलना केल्यास कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजे या कंपनीचा नफा तोटा जर बघायचा झाला तर सध्या ही कंपनी तोट्यामध्ये आहे तर जवळपास 31 मार्च 2022 ला जवळपास 784 कोटी 15 लाख इतका तोटा होता 31 मार्च 2023 ला 1472 कोटी 80 हजार इतका तोटा होता तर 31 मार्च 2024 ला 1584 कोटी चाळीस लाख इतका तोटा या कंपनीला झालेला दिसत आहे. अर्थातच लॉस होण्याचे टक्केवारी मध्ये 2023 ची 2024 सोबत तुलना केल्यास घट झाल्याचे दिसत आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येत आहे की कंपनीच्या महसुली उत्पन्नामध्ये वाढ होत असली तरी निव्वळ नफा नसून निव्वळ तोट्यामध्ये ही कंपनी आहे आणि जर कंपनीवर असलेल्या कर्जाचा जर विचार केला तर त्यामध्ये देखील वाढ होताना दिसत आहे 31 मार्च 2022 ला 750 कोटी 41 लाख इतके कर्ज कंपनीवर होतं. तर 31 मार्च 2023 रोजी 1645 कोटी 75 लाख इतके कर्ज या कंपनीवर होते तर 31 मार्च 2024 चा विचार केलास या कर्जामध्ये 2389 कोटी 21 लाख इतकी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे यावरून एक गोष्ट लक्षात घेत आहे या कंपनीवर मोठ्या प्रमाणात कर्ज देखील आहे . कंपनीच्या वित्तीय बाबतीत जर विचार केला तर कंपनीची वित्तीय कामगिरी एवढी चांगली नाहीये. तर याच क्षेत्रात इतर कंपन्यांच्या काम करत आहेत तर त्या कंपन्या म्हणजे TVS motors, Eicher motors, Bajaj auto, Hero motocorp इत्यादी कंपन्यांचा PE ratio म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो बघितला तर या कंपन्या या ओला इलेक्ट्रिक पेक्षा सरस ठरतात कारण ओला कंपनी सद्या तोट्या मध्ये आहे पण पूर्णपणे इवी सेक्टरमध्ये एकमेव कंपनी आहे अर्थातच वरील ज्या पियर कंपन्या पण बघितल्या त्या देखील या क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात काम करत आहेत. तर व्हॅल्युएशन चा विचार करता ही कंपनी थोडीशी महाग वाटत आहे.

IPO विषयी थोडक्यात :

तर कंपनीच्या आयपीओ बद्दल बोलायचं झालं तर 1ऑगस्ट 2024 पासून IPO सुरू होत असून 6 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख आहे. फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर. प्राईस बँड 72 ते 76 प्रति शेअर इतका आहे LOT SIZE ही 195 शेअर्सचे असून टोटल आयपीओची ची इश्यू साइज आहे ती 6145 कोटी 56 लाख इतकी असून ज्यामध्ये नवीन शेअर जे जारी केले जातील तो आहे 5500 कोटी रुपयांचा तर जे सध्याचे गुंतवणूकदार आहे त्यांच्या कडून जो ऑफर फॉर सेल आहे तो आहे 645 कोटी 56 लाख रुपये.कर्मचाऱ्यांसाठी सात रुपये प्रति शेअर इतका डिस्काउंट देखील असेल. तरी आयपीओ च्या माध्यमातून जो निधी उभा केला जाईल त्याचा उपयोग हा ही कंपनी कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी त्याचबरोबर बाराशे सत्तावीस कोटी रुपये हे भांडवली खर्च करणार आहे ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे 5 GWH पासून 6.4 गिगावॅट पर्यंत ती वाढवणार आहे. तर 1600 कोटी रुपये हे रिसर्च आणि डेव्हलपमेंट यावर खर्च केला जाणार आहे. त्याच बरोबर इतर जनरल कार्पोरेट पर्पजसाठी ह्या निधी कामात येणार आहे. दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीच्या आयपीओ मध्ये रिटेल कॅटेगिरी साठी दहा टक्के इतका कोटा असेल. तर वरील सर्व गोष्टीचा विचार करता तुम्हाला स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे. कारण ग्रे मार्केट प्रीमियम चा जर विचार केला तर सध्या तरी सकारात्मक दिसत असून 16 ते 17 रुपये प्रति शेअर इतका नफा दाखवत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अँकर लिस्ट म्हणजेच मोठमोठ्या वित्तीय कंपन्या, म्युच्युअल फंड कंपन्याने या कंपनीच्या अँकर इन्वेस्टर च्या माध्यमातून केलेली गुंतवणूक.

ANCHOR INVESTMENT– अँकर इन्वेस्टमेंटच्या माध्यमातून या कंपनीत 2763 कोटी रुपये इतकी रक्कम मिळवले आहे या अँकर इन्व्हेस्टर्स मध्ये महत्त्वाच्या कंपन्यांचा जर विचार केला तर SBI mutual fund ,HDFC mutual fund, nipon India mutual fund, Sundaram mutual fund, Bandhan mutual fund, Bharti axa Life insurance company, Kotak Mahindra Life insurance company, government pension fund global, Nomura India investment , goldman sachs Singapore PT limited and fidelity यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी या आयपीओच्या माध्यमातून या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे दिसत आहे ही देखील एक सकारात्मक बाप या आयपीओ साठी दिसत आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करता बाजारातील अनुभवी तज्ञ असं सांगतात की या ipo बद्दल मोठ्या प्रमाणात हवा असून paytm सारखच यामध्ये शेअर लिस्ट झाल्यानंतर शेअर खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर कंपनी अजून पर्यंत तोट्यातच असून अजून पर्यंत एकदाही या कंपनीला नफा झालेला नाही त्याचबरोबर शासनाची धोरणे भविष्यात कशी असतील इलेक्ट्रिक व्हेईकल बद्दल हे देखील महत्त्वाचं आहे त्याचबरोबर इलेक्ट्रिक vehicle च्या मार्केट मध्ये OLA इलेक्ट्रिकच्या मार्केट शेअर सध्या जास्त असून भविष्यामध्ये मात्र मोठमोठ्या कंपन्या जेव्हा इलेक्ट्रिकलच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उतरतील तेव्हा मात्र या कंपनीला मोठ्या प्रमाणात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल हे देखील या कंपनीच्या बाबतीत बोलले जाते. आणि सकारात्मक बाबींचा जर विचार केला तर ती म्हणजे या कंपनीचे जे प्रमोटर आहे यांनी अवघ्या तीन वर्षात प्रॉडक्ट उभं केलं आहे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर त्या प्रमोटर चे असलेले फंड उभारण्याचे कौशल्य. त्याचबरोबर कंपनीची असलेली आधुनिक मॅन्युफॅक्चरिंग युनिट. अनुभवी प्रमोटर या सर्व सकारात्मक बाबींचा विचार केला जाऊ शकतो.

(शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या आधीन असते कुठलीहि गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा. वरील लेख माहिती पर असून आम्ही कुठल्याही प्रकारचा शेअर खरेदी किंवा विक्रीचा सल्ला देत नाही )

Leave a Comment