Ceigall india ltd या कंपनीचा आयपीओ आज पासून म्हणजेच 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला झाला असून आज आपण या लेखांमध्ये या ipo बद्दल माहिती घेणार आहोत ज्यामध्ये ही कंपनी कुठल्या क्षेत्रात काम करते, कंपनीची वित्तीय कामगिरी कशी आहे, त्याचबरोबर ग्रे मार्केट प्रीमियम मध्ये या ipo ला किती टक्के लिस्टिंग गेन मिळू शकते याबद्दलची जी माहिती आहे ते आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. सध्या या कंपनीला ग्रे मार्केट प्रीमियम मध्ये 22 टक्के इतका म्हणजेच 90 रुपये प्रति शेअर इतका लिस्टिंग गेम होईल असं सांगत आहे. अर्थातच जीएमपी आणि शेअरची ऍक्च्युअल लिस्टिंग यामध्ये फरक असू शकतो फक्त आपल्याला यावरून एक अंदाज घेता येईल की सध्या तरी या कंपनीची लिस्ट पॉझिटिव किंवा निगेटिव्ह होईल अर्थातच मार्केटच्या कंडीशननुसार ग्रे मार्केट प्रीमियम मध्ये कमी जास्त होऊ शकते.कंपनी बद्दल सांगायचं झालं तर हि कंपनी 2002 मध्ये स्थापन झालेली असून जवळपास 22 वर्षापासून ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन या क्षेत्रात विशेष कार्य करत आहे. त्यामध्ये स्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स असतील, त्यानंतर फ्लाय ओवर ब्रिजेस असतील, रेल्वेओवपासेस असतील,त्यानंतर भुयारी मार्ग असतील , हायवे असतील , एक्सप्रेस वेज असतील किंवा इतर रस्त्यांचे काम ही कंपनी करते. या कामांमध्ये कंपनीची expertise आहे. सध्या कंपनीकडे 9470 कोटीचे ऑर्डर बुक आहे.
वित्तीय बाजू बघायचं झालं तरी या कंपनीचे 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2024 यामध्ये 1827 कोटी 82 लाख वरून 2592 कोटी 19 लाख इतकी संपत्ती मध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर महसुलाचा विचार केला तर 2087 कोटी 4 लाख वरून 3066 कोटी 19 लाख इतका महसुल या कंपनीमध्ये वाढीचा दिसत आहे. तर कंपनीच्या निव्वळ नफा बघितला तर 31 मार्च 2023 ला 167 कोटी 70 लाख होता. तर 31 मार्च 2024 ला 3004 कोटी 91 लाख इतकी यामध्ये घसघशीत वाढ होताना दिसत आहे. तर कंपनीच्या जर कर्जांचा विचार केला तर कंपनीवर सध्या 1811 कोटी इतके कर्ज असताना दिसत आहे. कर्जांचा विचार केला तर कंपनीवरील कर्ज देखील 31 मार्च 2023 ला 1252 कोटी 58 लाख इतकं होतं तर त्यामध्ये देखील आपण 1811 कोटी दोन लाख इतकी अशी वाढ होताना दिसत आहे. यामध्ये कर्जाचे इक्विटीशी असलेले गुणोत्तर जे आहे एक पेक्षा जास्त आहे म्हणजे कंपनीवरील कर्ज जास्त आहे. कंपनीवर ROE म्हणजेच रिटर्न ऑन equity ही 33.57% इतकी आहे. तर रिटर्न ऑन नेटवर्थ् देखील 33.57% इतकच आहे. तर या कंपनीच्या इस्टेट peer कंपन्या म्हणजेच स्पर्धक कंपन्यांचा जर विचार केला तर यामध्ये यामध्ये PNC infratech, GR infra projects, Hg infra projects, knr construction, itdcmentation, j Kumar infra, SRK company. Ceigall india ltd ची इतर यांच्या स्पर्धक कंपन्या बरोबर जर तुलना केली तरी या इतर कंपनीच्या तुलनेत या कंपनीचे जे इन्कम आहे ते कमी आहे आणि प्राईझ टू अर्निंग म्हणजेच PE ratio ज्यामध्ये आपल्याला व्हॅल्युएशन कंपनीचे समजतील तर त्याचा जर विचार केला तर या कंपनीचा पीई रेशो हा 20.67 इतका आहे तर इतर स्पर्धक कंपन्याशी( peer company) तुलना केल्या तर बाकी सर्व बऱ्याचशा कंपनीचा PE रेशो हा 20 पेक्षा कमी आहे. म्हणजेच इतर कंपन्या ज्या बाजारामध्ये ऑलरेडी लिस्टेड आहेत. त्या या कंपनीच्या व्हॅल्युएशन पेक्षा कमी दराला मिळत आहेत म्हणजे या कंपनी पेक्षा कमी दरात या इतर कंपन्यांचे शेअर्स उपलब्ध आहेत.
IPO इशू बद्दल महत्त्वाच्या गोष्टी : महत्त्वाच्या तारखा सुरुवात दिनांक 1 ऑगस्ट 2024 तर शेवटचा दिनांक 5 ऑगस्ट 2024 हा आहे . फेस व्हॅल्यू 5 रुपये प्रति शेअर आहे. प्राईस बँड हा 380 ते 401 रुपया प्रति शेअर इतका. लॉट size 37 शेअर्स इतकी आहे. Retail किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान एक लाख म्हणजेच 14837 रुपये कमाल 13 लॉट्स म्हणजेच एक लाख 92 हजार 881 रुपये इतकी गुंतवणुकीची मर्यादा आहे. स्मॉल HNIs कॅटेगिरी साठी किमान 14 लॉट्स(518 शेअर्स) म्हणजेच 207718 रुपये इतकी तर कमाल 67 lots म्हणजेच नऊ लाख 94 हजार 79 रुपये इतकी गुंतवणूक मर्यादा असेल तर बिग HNIs या कॅटेगिरीसाठी 68 lots म्हणजेच दहा लाख 8 हजार 916 इतकी किमान गुंतवणुकीची मर्यादा असेलआयपीओ ची इशू साइज ही 1252 कोटी 66 लाख आहे, ज्यामध्ये जे नवीन शेअर्स जारी केले जातील ते आहेत 684 कोटी 25 लाख तर ofs म्हणजेच ऑफर फॉर सेल हा जवळपास 568 कोटी 41 लाख इतक्या रुपयांचा असेल. तरी आयपीओ चा उद्देश हा नवीन इक्विपमेंट खरेदी, त्यानंतर कंपनीचे जे काही कर्ज असतील ते देणे तसेच इतर जनरल पर्पजसाठी असेल. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 38 रुपये प्रति शर इतका डिस्काउंट असेल. या कंपनीची लिस्टिंगची तारीख आहे ती 8 ऑगस्ट या तारखेला शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.
अँकर लिस्ट : अँकर लिस्ट म्हणजेच या कंपनीच्या आयपीओ मध्ये जे काही म्युच्युअल फंड्स असतील व इतर asset management कंपन्या असतील यांनी गुंतवणूक किती केली आहे याचा देखील ह्या आयपीओची निवड करण्यासाठी आपल्याला फायदा होतो. तर या कंपनीमध्ये ICICI prudential flexicap fund, HDFC small cap fund, HDFC trustee company limited HDFC infrastructure fund ,nippon Life India trust limited, Kotak infrastructure and economic forum reform fund, Axis mutual fund , Tata multicap fund, edelweiss trusteeship company limited, Bank of India infrastructure and manufacturing fund, societe general ODI, Morgan Stanley Asia City group global market Mauritius private limited, HDFC small cap fund, HDFC infrastructure fund त्याचबरोबर इतरही बड्या mutual fund कंपन्यांनी या अँकर investment च्या माध्यमातून या कंपनीच्या आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्याचे दिसत आहे.
तर आपण या लेखांमध्ये कंपनीचे वित्तीय कामगिरी त्याचबरोबर कंपनीच्या इतर स्पर्धक कंपन्या बरोबर तुलना त्याचबरोबर ग्रे मार्केट प्रीमियम, Anchor investors या सर्व गोष्टी जाणून घेतल्या. वरील सर्व बाबीचा विचार करून आपण आपला निर्णय या ipo ला अप्लाय करायचा किंवा नाही याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे.
(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या आधी नसते कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा वरील लेखाचा उद्देश हा माहिती व शैक्षणिक एवढाच आहे.)