Akums Drugs and Pharmaceuticals ltd IPO बद्दल जाणून घ्या सर्व काही, ही आहे शेवटची तारीख

तर मित्रांनो आज आपण आपल्या या ब्लॉगमध्ये ज्या आयपीओ बद्दल माहिती घेणार आहोत त्या कंपनीचं नाव आहे Akums Drugs and Pharmaceuticals ltd तर हा आयपीओ गुंतवणुकीसाठी सुरू होणार आहे आजपासून म्हणजे 30 जुलै आणि बंद होणार आहे 01 ऑगस्ट 2024 रोजी तर त्या आयपीओ च नाव आहे. तर या ipo च्या बद्दल माहिती घेण्यासाठी आपण या कंपनी बद्दल कंपनीची आर्थिक कामगिरी त्याचबरोबर कंपनी नफ्यात आहे किंवा तोट्यात आहे किंवा या कंपनीचे जे काही स्पर्धक कंपन्या आहेत त्या कुठल्या आहेत त्याशिवाय आपण आयपीओला अप्लाय करायचं किंवा नाही याबद्दल देखील आपण इथे चर्चा करणार आहोत सर्वात पहिले म्हणजे या कंपनीचे ग्रे मार्केट प्रीमियम जर बघितलं ते 25 ते 26 टक्के च्या आसपास आहे सध्या रिटेल साठी तीन हजार सातशे ते चार हजार रुपयांच्या जवळपास या ipo मध्ये नफा मिळण्याची शक्यता सध्या ग्रे मार्केट प्रीमियम मध्ये दाखवत आहे तरीही बाजारातील चढउतारानुसार यामध्ये कमी जास्त होऊ शकते पूर्णपणे ग्रे मार्केटवर आपण अवलंबून राहू शकणार नाहीत. कारण पाठीमागच्या काही आयपीओ मध्ये आपण बघितलं त्यांची अगोदर जी एम पी खूप चांगल्या प्रमाणात होती परंतु जेव्हा केंद्र शासनाच्या बजेट नंतर बाजारामध्ये उतार पाहायला मिळाला त्याचबरोबर सदर काळातील आयपीएस ची लिस्टिंग देखील ग्रे मार्केट प्रीमियम पेक्षा वेगळी झालेलं आपण बघितलं.

चला तर कंपनी बद्दल जाणून घेऊया आता कंपनीची स्थापना 2004 मध्ये झालेली असून या कंपनीचे नाव Akums Drugs and Pharmaceuticals ltd .असा असून ही कंपनीचे जे मुख्य काम आहे ते cdmo म्हणजेच – कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन यासारख्या सेवा ही कंपनी देते. या प्रकारच्या व्यवसायात यामध्ये मोठ मोठ्या ज्या फार्मास्युटिकल कंपनी आहेत त्या इतर छोट्या कंपन्यांना औषधे बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतात व काही स्वतः बनवतात तर ही जी कंपनी आहे त्या ती काही कंपन्यांना औषधे बनवून देण्याची काम करते त्याच बरोबर इतर काही सेवा देखील ही कंपनी देण्याचे काम करते ज्यामध्ये टॅबलेट्स असतील इतर काही औषधे असतील यासारखी औषधे बनवण्याचे काम ही कंपनी करते त्याच बरोबर स्वतः कंपनी काही औषधे बनवण्याचे काम करते. जवळपास देशातील मोठमोठ्या 26 कंपन्यांसाठी ही कंपनी आपल्या सेवा देते त्याचबरोबर विदेशातील कंपनीचा व्यवहारही खूप चांगला आहे. फार्मास्युटिकल क्षेत्राचा विचार केला तर हे खूप स्पर्धात्मक क्षेत्र आहे.

तर कंपनीच्या आर्थिक कामगिरीचा जर विचार केला तर 2022 ते 2024 पर्यंत जर विचार केला आपण तर asset बघितलं तर वर्षानुवर्षी ग्रोथ दाखवत आहे आणि जो कंपनीचा महसूल आहे तो 2022 पासून ते 2024 पर्यंत वाढताना दिसत आहे. 31 मार्च 2023 ला 3700 कोटी तर मार्च 2024 ला 4212 कोटी अशी यामध्ये वाढ होताना दिसत आहे. जर कंपनीच्या निव्वळ नफा बघितला तर 2022 ला जर बघितलं तर 250 कोटी इतका तोटा कंपनीने दाखवलेला आहे तर 31 मार्च 2023 ला बघितलं तर 97 कोटी 82 लाख इतका नफा तर 31 मार्च 2024 ला जर बघितलं तर निव्वळ नफा हा 79 लाख असा इतका कमी होताना दिसलेला आहे. ही मात्र एक नकारात्मक गोष्ट या कंपनीच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. कंपनी वर असलेल्या कर्जांचा विचार केला तर हे वाढ होताना दिसत आहे 31 मार्च 2022 रोजी कंपनीवर 357 कोटी 95 लाख इतकी कर्ज होती. तर त्यामध्ये 31 मार्च 2024 अखेर 491 कोटी 56 लाख असे वाढ होताना दिसत आहे हे देखील एक नकारात्मक गोष्ट या कंपनीबाबत आहे. नेटवर्थ चा जर विचार केला तर 31 मार्च 2023 ला 717 कोटी होत असून 31 मार्च 2024 ला 709 कोटी इतका दिसत आहे . यामध्ये देखील घटच पाहायला मिळत आहे. ROE – रिटर्न ऑन इक्विटीचा जर विचार केला तर 0.11% म्हणजे खरच खूपच कमी आहे तर ROCE 3.37% इतका दिसत आहे. कर्जाचा जर समभागाशी गुणोत्तर पाहिलं तर 0.69 इतकं आहे जे ठीक आहे.इतर स्पर्धक कंपन्यांच्या बाबतीत जर तुलनात्मक विचार केला तर या कंपनीचे जे व्हॅल्युएशन्स आहेत ते थोडे महाग दिसत आहेत.

आयपीओ डिटेल्स :- आयपीओ सुरु होण्याची तारीख 30 जुलै 2024 तर शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2024 अशी आहे. कंपनीच्या फेस व्हॅल्यू दोन रुपये प्रति शेअर आहे आणि प्राईस बँड चा जर विचार केला 646 ते 679 इतका आहे प्लॉट साइज 22 शेअर्सची आहे टोटल इश्यू साइज जर बघितली तर 27345162 इतक्या शेअर्समधून जवळपास 1856 कोटी 74 लाख रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे. ज्यापैकी 680 कोटीचे नवीन शेअर्स असतील, तर 1176 कोटी 74 लाख इतक्या किमतीचा ऑफर फॉर सेल म्हणजेच प्रमोटर काही आपला हिसा विकत असतील किंवा जे सध्याचे शेअर होल्डर्स असतील ते सुद्धा शेअर विकत असतील तर त्या ऑफर फॉर सेल असं म्हटलं जातं कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 64 रुपये प्रति शेअर इतका डिस्काउंट असेल. तर कंपनीची लिस्टिंग तरी ही 6 ऑगस्ट 2024 आहे.
तर ह्या कंपनीच्या आर्थिक स्थिती आयपीओ डिटेल्स व इतर सर्व बाबी आपण चेक केलेले आहेत तर या कंपनीमध्ये आपल्याला अप्लाय करायचा किंवा नाही हा पूर्णपणे आपला निर्णय आहे जर grey market premium चा विचार केला तर सध्या तरी 25% इतका नफा या ipo मध्ये मिळताना दिसत आहे.

(शेअर बाजारामधील गुंतवणूक ही जोखमींच्या अधिन असते. कुठलेही प्रकारचे गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागारचा सल्ला जरूर घ्या .वरील लेख हा माहितीपर व शैक्षणिक दृष्टिकोनातून आहे.)

Leave a Comment