IPO म्हणजे काय? IPO कसा विकत घ्यायचा? जाणुन घ्या IPO विषयी.

आपल्या देशात बऱ्याच कंपन्या आहेत की, ज्या कंपनीचे शेअर्स हे खाजगीरित्या विविध लोकांकडे आहेत आणि जाहिरपणे त्याची खरेदी- विक्री होत नाही (किंवा अनलिस्टेड शेअर्स खरेदी विक्रीच्या माध्यमातून कमी प्रमाणात असे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात पण त्यामध्ये तरलता खूप कमी असते ) व या कंपन्यांचे शेअर बाजारात लिस्टींग झालेले नाही.अशा कंपन्या जेव्हा पहिल्यांदा आपले शेअर्स शेअर बाजारामध्ये विक्रीसाठी खुले करतात व लोकांना हे शेअर पहिल्यांदाच इशू केले जातात यालाच आयपीओ अर्थात इनिशियल पब्लिक ऑफरिंग ( IPO Initial Public offering) असे म्हणतात. अशावेळी कंपनीचे शेअर्सची पहिल्यांदाच शेअर बाजारात खुल्या पद्धतीने खरेदी विक्री होते. तर आज आपण या लेखांमध्ये हेच पाहणार आहोत की कंपनी ही शेअर्स का इशू करते. आयपीओ मध्ये गुंतवणूक कशी करावी. किंवा गुंतवणूक करावी किंवा नाही.

ज्या वेळेस कंपनीचा कारभार चालविण्यासाठी किंवा तिचा व्यापार वृद्धीसाठी विस्तार करण्यासाठी कंपनीचे जे प्रमोटर असतात त्यांच्याकडे पैसा त्यांनी विविध बँका किंवा संस्थांकडून कर्जाच्या स्वरूपात घेतलेला पैसा हा अपुरा ठरतो, शिवाय कर्जाच्या महाग दरापेक्षा जनतेकडून प्रत्यक्ष गुंतवणूक ही संबधित कंपनीला फायदेशीर ठरते तेव्हा अशा वेळेस कंपनी जाहिररित्या जनतेला, ज्यांना कंपनीच्या वाढीत हातभार लावायचा आहे त्यांना गुंतवणूक करण्याचे आवाहन या आयपीओ मार्फत करते आणि गुंतवणूकदारांना शेअर्स दिले जातात. यासाठी त्यांना पब्लिक इश्यू बाजारात आणावा लगतो. सेबीच्या नियमाप्रमाणे एक पूर्ण प्रक्रिया या आयपीओची केली जाते. इश्यूची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सेबीच्या नियमाप्रमाणे कंपनी अर्जदाराला शेअर्सचे वाटप करते.

IPO आणि FPO मध्ये काय फरक आहे?

आपण वर पाहिले की जेव्हा कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स शेअर बाजारात जनतेला इशू करते त्यास आयपीओ म्हणतात. परंतू बऱ्याचदा शेअर बाजारामध्ये कंपन्या अगोदरच लिस्टेड आहेत व ज्यांच्या शेअरची खरेदी विक्री अगोदरच सुरु असते हया कंपन्या जास्तीचा निधी जमा करण्यासाठी, नवीन शेअर्स जारी करण्यासाठी परत अधिकचे शेअर्स इशू करतात ज्याला फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) म्हटले जाते कारण की, अगोदरच त्या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टींग झालेले असल्यामुळे शेअर बाजारात त्यांचे ट्रेडिंग सुरूच असते.

पूर्वी बहुतांश आयपीओमध्ये जेव्हा तुम्ही अर्ज करत असत तेंव्हा तुम्हाला पूर्ण रक्कम भरावी लागत होती आणि अॅलॉटमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, जर तुम्हाला कोणतेही शेअर्सची वाटणी झाली नाही अथवा तुम्ही जेवढया शेअर्ससाठी अर्ज करून पैशांची भरपाई केली होती त्यापेक्षा कमी शेअर्सची वाटणी करण्यात आली तर तुम्हाला रिफंड मिळत होते. या प्रक्रियेस भरपूर वेळ लागत होता. व आपले पैसे बरेच दिवस अडकून रहायचे ही प्रक्रिया आता एएसबीए(अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउन्ट) ने पूर्णपणे बदलली आहे. ही प्रक्रिया आता खूप सोपी करण्यात आलेली आहे त्याशिवाय आपले पैसे आपल्याच अकाउंट वर ब्लॉक केले जातात. हे खूप कमी कालावधीसाठी अलीकडेच सेबीने हा कालावधी आणखी कमी केलेला आहे.शेअर्सची वाटणी झाल्यावर त्यांचे शेअर बाजारात लिस्टींग होते. आणि लिस्टींग झाल्यानंतर तुम्ही तुमच्या शेअर्सच्या इच्छेप्रमाणे खरेदी विक्री करू शकता.

IPO अलॉटमेंट कसे होते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही आयपीओला अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. तर आयपीओला अर्ज केल्यानंतर त्या शेअर्सची अलॉटमेंट कशी होते हे आपण पाहूया. विषय असा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या IPO ला अप्लाय केलं म्हणजे दर वेळेस मिळते का? तर असं नाही आता हे का हे पण समजून घेन तितकच गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला शेअर्स मिळणार नाहीत इथं चक्क लॉटरी सिस्टीम प्रमाणे काही लोकांची निवड होते. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या कंपनीला जर दहा शेअर्स इश्यू करायचे असतील मागणी आली 100 शेअर्सची यावरून आपल्याला समजते की पुरवठा हा दहा शेअरचा असून मागणी ही 100 शेअर्सची आहे म्हणजे दहा पट आहे यामुळे प्रत्येक व्यक्तीला शेअर्स मिळतीलच असं नाही इथे लॉटरी पद्धतीने शेअर्स इशू केले जातात. ipo मध्ये कंपनीच्या शेअर्सची लॉट साईझ ठरवलेली असते त्या लॉटमध्ये शेअर्सला अप्लाय करायचा असतो. जेव्हा शेअर्सला मागणी ही खूप मोठ्या प्रमाणात असते तेव्हा कम्प्युटराईज लॉटरी सिस्टिम पद्धतीने शेअर्स इशू केले जातात. असं नाही की कुणी जास्त रकमेसाठी अर्ज केला असेल त्यालाच मिळेल आणि जर कुणी कमी शेअर्स साठी apply केला असेल तर त्याला मिळणार नाही असं अजिबात नाही. शेअर्स अलोटमेंट नाही ही लॉटरी पद्धतीनेच होईल.

IPO मध्ये गुंतवणूकदारांची विभागणी

आयपीओ मध्ये विविध स्तरावर गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. तर त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या रकमांच्या आधारावर त्यांची विभागणी केली जाते.

  • QIB Qualified Institutional Buyers :- या प्रकारच्या गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड्स,फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, परदेशी गुंतवणूकदार संस्था,व्यापारी बँका,सार्वजनिक वित्तीय संस्था उदा. LIC . हे मोठे गुंतवणूकदार असून सेबी रजिस्टर असतात. या प्रकारच्या गुंतवणूकदारांना 50% ते 75 टक्के एवढा कोटा आयपीओ मध्ये राखीव असतो.
  • NII- Non institutional investors :- या प्रकारच्या गुंतवणूकदारांमध्ये HNIs हाय नेटवर्थ इंडिविज्युअल यांचा समावेश होतो जे. यामध्ये देखील दोन सब कॅटेगिरीज करण्यात आलेले आहे एक म्हणजे smal HNIs दुसरे म्हणजे Big HNIs यामध्ये पहिल्या प्रकारच्या गुंतवणूकदारांमध्ये जे दोन लाख ते दहा लाख रुपये पर्यंतच्या गुंतवणुकी या ipo साठी करतात. तर BHNIs मध्ये दहा लाखापेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा समावेश होतो. प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आयपीओ मध्ये विशिष्ट कोटा राखीव असतो ठेवलेला असतो.
  • EMPLOYEES :- काही कंपन्या आपल्या आयपीओ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशिष्ट शेअर चा कोटा राखीव ठेवतात त्याच बरोबर विशिष्ट प्रकारच्या किमतीचा डिस्काउंट देखील देत असतात.
  • शेअर होल्डर :- जेव्हा एखादी कंपनी आपल्या त्याच ग्रुप मधील दुसरे एका कंपनीचा आयपीओ बाजारात घेऊन येते. त्यावेळी कधीकधी अशा कंपन्या आपल्या पॅरेंट कंपन्यांच्या शेअर धारकांसाठी विशिष्ट शेअर्सचा कोटा या राखीव ठेवतात. उदाहरणार्थ बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनी जर आपला आयपीओ घेऊन येत असेल तर ती bajaj finserve च्या गुंतवणूकदारांसाठी असा शेअर होल्डर कोटा ठेवू शकते.
  • किरकोळ गुंतवणूकदार /Retail Individual Investors :- जे निवासी भारतीय, NRIs, हिंदू अविभाजित कुटुंब असे गुंतवणूकदार ज्यांची गुंतवणूक हे दोन लाख रुपये पेक्षा कमी रकमेसाठीची आहे अशा गुंतवणूकदारांना किरकोळ गुंतवणूकदार असे म्हणतात. आयपीओच्या प्रकारानुसार किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के पर्यंत इतका राखीव कोटा असतो.
  • ANCHOR INVESTORS :- या प्रकारचे गुंतवणूकदार हे संस्थात्मक गुंतवणूकदार असून सुरू होण्याच्या अगोदरच एका फिक्स्ड किमतीला शेअर्सचे वितरण या प्रकारच्या गुंतवणूकदारांना केले जाते. अर्थातच एका विशिष्ट प्रकारचा खोटा या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी राखीव असतो. त्याचबरोबर मुख्य धारेतील आयपीओ साठी किमान दहा कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीचे बंधन या प्रकारच्या गुंतवणूकदारासाठी असते, तर SMEs घरच्या आयपीएस साठी किमान एक कोटी रुपयांची गुंतवणूक करणे या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी बंधनकारक असते. अँकर इन्व्हेस्टर्स साठी गुंतवणूक ही लॉक इन असते.किमान 30 दिवस ते 90 दिवस असा लॉकिंग पिरेड असतो. त्याचबरोबर इतर काही बंधने देखील या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी असतात.

IPO मध्ये नफा की तोटा :-

जेव्हा एखाद्या कंपनीचे आयपीओ साठी तुम्ही अप्लाय करता. अर्थातच त्या कंपनीच्या आयपीओ साठी असलेल्या मागणी प्रमाणे तुम्हाला आयपीओच्या अलोटमेंट होण्याचे प्रमाण ठरलेले असते. अर्थातच आयपीओद्वारे लिस्टिंगच्या दिवशीच म्हणजे चार ते पाच दिवसाच्या आतच तुम्हाला मोठा नफा होण्याची शक्यता असते पण हे सर्व त्या कंपनीच्या गुणवत्तेवर व त्या संबंधित कंपनीच्या शेअर्सला असलेल्या मागणीवर अवलंबून असते. त्याचबरोबर बाजारावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टी जसे की आंतरराष्ट्रीय घडामोडी, देशाची राजकीय, सामाजिक व आर्थिक स्थिती या गोष्टीचा देखील बराचसा परिणाम असतो. त्यामुळे आयपीओ मधील गुंतवणूकीतून तुम्हाला निश्चितच नफा किंवा तोटा होईल हे असे नक्की सांगता येत नाही. शेअर्सची अलोटमेंट झाल्यावर त्यांचे शेअर बाजारात लिस्टींग होते आणि लिस्टींग झाल्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे खरेदी विक्री करू शकता.
साधारणपणे लोक असे मानतात की, शेअर बाजारात तेजी असेल तेव्हा आयपीओ पैशांची कमाई करण्यासाठी चांगला पर्याय आहे परंतु अशा वेळेस अनेकदा कंपनी विषयी संपूर्ण माहिती मिळविल्या शिवाय आपल्या पैशाची गुंतवणूक करणे हे नुकसानकारक ठरू शकते . तेजीचा लाभ ज्याप्रमाणे गुंतवणूकदार उचलू शकतात त्याप्रमाणे पळकाढणाऱ्या कंपनीचे प्रमोटर पण त्याचा फायदा घेतात आणि आयपीओ मार्फत भांडवल उभे करून त्यानंतर गुंतवणूकदारांना फसवतात .जर तुम्हाला आयपीओ च्या माध्यमातून कमाई करायची असेल तर त्या कंपनी विषयी शक्य तितकी अधिक माहिती मिळविली पाहिजे. आयपीओच्या वेळेस कंपनीला नियमाप्रमाणे ऑफर डॉक्यूमेन्ट्स आणि प्रॉस्पेक्ट्स जाहिर करावे लागते. ज्यात कंपनीविषयी सर्व माहिती दिलेली असते. ते लक्षपूर्वक वाचले पाहिजे. त्यानंतर क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारे काढण्यात आलेले आयपीओ रेटिंगची तपासणी केली पाहिजे.

आयपीओद्वारे शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याआधी खालील गोष्टी पाहाव्यात :-

IPO इश्यू आणण्याचा हेतू काय आहे?

प्रमोटर कोण आहेत?

इश्यूची साइज केवढी आहे?

बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये कोण आहेत?

कंपनीला आयपीओ मधून कितीभांडवल जमा करायचे आहे?


कंपनीची प्रोडक्ट सर्विस कशी आहे?

कंपनीची कामगिरी कशी आहे?


कंपनीचे इपीएस (अर्निंग पर शेअर), पीई (प्राईज-अनिंग) रेशो, पीईजी
(प्राईज-अनिंग-ग्रोथ ) रेशो, भांडवलावरील मिळकत (रिर्टन ऑन
कॅपिटल), ईबीआयटीडीए आणि एन्टरप्राईज व्हॅल्यू (ईवी), इत्यादी
आर्थिक बाबी कशा आहेत ?


कंपनी डिविडन्ड देते की नाही?


इश्यू नंतर पब्लिक फ्लोट किती असेल?


इश्यू नंतर प्रमोटरांजवळील होल्डिंग किती असेल?


ऑफर भाव योग्य आहे की नाही?

इत्यादी.

आयपीओसाठी अर्ज कसा करावा?

1) ऑफलाईन मोड (Offline Mode) :

आयपीओसाठीचा अर्ज फॉर्म कोणत्याही ब्रोकरच्या ऑफिस मधून मिळवून तो संपूर्णपणे भरून द्या. तुम्हाला फॉर्ममध्ये तुमच्या नाव, पॅन नंबर, डिमॅट अकाउंट नंबर, बिड संख्या, बिड प्राईझ, बँक खात्याची माहिती आणि इतर संबंधित माहिती चे उल्लेख करावे लागते. पूर्ण फॉर्म भरून, हा फॉर्म बँक किंवा एजंटला ठराविक वेळेत सबमिट करा. Mandate form भरून तुम्ही ब्लॉक करू शकता.

2) ऑनलाईन :-
यामध्ये देखील दोन प्रकारे आयपीओ साठी काय करता येते एक म्हणजे तुमचे ज्या नॅशनल बँकेमध्ये खाते आहे त्या बँकेच्या नेट बँकिंग द्वारे मला एएसबीएसाठी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग ची सुविधा असेल तर आपण आपल्या ब्रोकर कडे उपलब्ध असलेल्या आपल्या डिमॅट अकाउंट ची डिटेल्स टाकून आपण इंटरनेट बँकिंग द्वारे अर्ज करू शकतो. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये ज्या ब्रोकरकडे आपली डिमॅट अकाउंट आहे ब्रोकरचे एप्लीकेशन मधून आपण ipo साठी अप्लाय करू शकतो. ज्यामध्ये यूपीआय ऍड्रेस टाकून आपण आयपीएस साठीची जी ठराविक रक्कम आहे ती ब्लॉक करू शकतो.

अशा पद्धतीने आपण आयपीएल द्वारे कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतो.

( Disclaimer :- शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस chanakyaview.com जबाबदार राहणार नाही.)

Leave a Comment