तर मित्रांनो आज आपण ज्या IPO बद्दल माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे Brainbees Solutions limited म्हणजेच firstcry या नावानेच ही कंपनी जास्त प्रसिद्ध आहे. तर आज मित्रांनो आपण पाहूयात या कंपनीच्या IPO ची साईज किती आहे. महत्त्वाचे दिनांक कोणते आहेत की आयपीओ कधी सुरू झाला आणि कधी शेवट होणार त्याचबरोबर grey market premium यासारख्या गोष्टी त्याचबरोबर कंपनीचे फंडामेंटल ,कंपनीचे वित्तीय स्थिती व इतर सर्व बाबी आपण जाणून घेणार आहोत. तर सध्या तर कंपनीच्या share ला जी एम पी म्हणजेच ग्रे मार्केट प्रीमियम हा 17 ते 18 टक्क्यांच्या दरम्यान आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव व इतर शेअर बाजारातील दबावामुळे सर्वच आयपीओंच्या जी एम पी मध्ये दबाव आपण पाहत आहोत. अर्थातच जीएमपी हा बाजारातील चढउतारावर अवलंबून असतो व कंपनीची लिस्टिंग यापेक्षा वेगळी असू शकते.
कंपनी बद्दल
जर कंपनी बद्दल जाणून घ्यायचं झालं तर कंपनीची स्थापना ही 2010 ची आहे तर Brainbees Solutions limited अर्थातच ही कंपनी फर्स्ट क्राय या brand नावाने जास्त प्रसिद्ध आहे. तर ही कंपनी नवजात बालके,लहान बाळ आणि आईंसाठी वेगवेगळे प्रॉडक्ट ही डिलिव्हर करण्याचं काम करते ज्याचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा फर्स्ट क्राय आहे. तर Brainbees Solutions limited कंपनी मल्टी ब्रँड रिटेल क्षेत्रात एक चांगल्या पद्धतीने मार्केट शेअर असलेली कंपनी आहे. ज्यामध्ये ती apparel त्याच्यानंतर लहान मुलांचे खेळणे असतील त्यानंतर पर्सनल केअर च्या गोष्टी असतील त्याचबरोबर डायपर्स असतील त्याच्या नंतर चप्पल शूज त्याच्यानंतर लहान मुलांचे कपडे , स्टेशनरीज असतील त्यानंतर पुस्तके असतील इतर फॅशनेबल गोष्टी असतील त्याचबरोबर skincare प्रॉडक्ट असतील यासारखे विविध प्रकारचे 7000 पेक्षा जास्त प्रॉडक्ट ही कंपनी आपल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म मार्फत ऑफर करते. ही कंपनी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग त्यानंतर स्वतःच्या ब्रँड यासारख्या दोन्ही बाबींमध्ये कार्यरत आहे. कंपनीचे पूर्ण भारतामध्ये 1063 इतके स्टोर आहेत 533 शहरांमध्ये त्याचबरोबर भारतातील 28 राज्यांमध्ये व पाच केंद्रशासित प्रदेशांमध्ये या कंपनीचे स्टोअर्स आहेत. तर कंपनीचा मार्केट शेअर आहे जो बेबी केअर ,नवजात बालके आणि mothers यासारख्या क्षेत्रांमध्ये जवळपास 16 ते 17 टक्के आहे. म्हणजेच या क्षेत्रातील एक लीडर कंपनी आहे यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कंपनी आपल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म फर्स्ट क्राय यावरूनही प्रॉडक्ट डिलिव्हरी होते त्याचबरोबर कंपनीचे स्वतःचे शोरूम्स पण आहेत.
कंपनीची आर्थिक स्थिती :-
आता बघूया या कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे व आर्थिक कामगिरी कशी आहे तर यामध्ये जर कंपनीच्या संपत्ती बद्दल बोलायचं झालं तर 31 मार्च 2023 ला 7119 कोटी 83 लाख इतके असून ते 31 मार्च 2024 पर्यंत त्यामध्ये 7510 कोटी 38 लाख इतकी वाढ होताना दिसत आहे. जर कंपनीच्या महसुलाबद्दल जर बोलायचं झालं तर 31 मार्च 2023 ला 5731 कोटी 28 लाख यावरून 31 मार्च 2024 पर्यंत 6575 कोटी आठ लाख अशी वाढ होताना दिसत आहे. जर रेवेन्यू बघितला तर यामधील वाढ ही खूप चांगली आहे.आता बघुया तर कंपनीच्या निव्वळ नफ्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते 31 मार्च 2023 ला 486 कोटी सहा लाख का तोटा या कंपनीला झालेला होता, तर 31 मार्च 2024 पर्यंत तो 321 कोटी 51 लाख इतका तोटा कंपनीला झालेला आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की ही कंपनी तोट्या मध्ये आहे.आता जर कंपनीकडे असलेल्या कॅश सरप्लस बद्दल जर बोलायचं झालं तर 3367 कोटी 21 लाख 31 मार्च 2023 रोजी ची रक्कम 31 मार्च 2024 ला 381 कोटी 74 लाख अशी कमी यामध्ये आलेली आहे. आता जर कंपनीच्या वर असलेल्या कर्जांबद्दल जर बोलायचं झालं तर 31 मार्च 2023 ला कंपनीवर 176 कोटी 47 लाख इतकं कर्ज होतं तर 31 मार्च 2024 पर्यंत यामध्ये 462 कोटी वाढवताना दिसत आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात ही कंपनी कर्जामध्ये देखील वाढ होते आहे. आता कंपनीची या क्षेत्रातील इतर पीयर्स कंपन्या म्हणजेच कंपनीच्या ज्या स्पर्धक कंपन्या आहे यांच्याबद्दल बरोबर आपण तुलना करू शकत नाही कारण सध्या तरी शेअर बाजारामध्ये लिस्टेड अशी या कंपनीचे कुठलीही स्पर्धक कंपनी नाही आहे. अर्थातच कंपनीचे जर शेअर्सची व्हॅल्युएशन बघितली तर ही थोडी महाग आहे.
IPO विषयी थोडक्यात
या IPO गुंतवणुकीसाठी दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी खुला झाला असून शेवटची तारीख ही 8 ऑगस्ट 2024 आहे, तर प्राईस बँड आहे 440 ते 465 प्रतिशेअर असुन lot size आहे 32 शेअर्स प्रति लॉट.रिटेल इन्वेस्टर्स जे आहे त्यांच्यासाठी किमान एक लॉट (32 shares) ज्याची मिनिमम इन्वेस्टमेंट ही 14880 आहे तर मॅक्झिमम ते 13 lots म्हणजे 416 शेअर साठी अर्ज करू शकतात, त्याची अमाऊंट 1 लाख 93 हजार 440 इतकी आहे, तर स्मॉल HNIs कॅटेगिरी साठी किमान गुंतवणूक ही 2 लाख 8 हजार 320 इतकी असून कमाल ते 67 लॉट्ससाठी म्हणजेच 2144 शेअर्स आणि ज्याचे मूल्य 9 लाख 96 हजार 960 यासाठी अर्ज करू शकतात, तर जी बिग HNIs कॅटेगिरी आहे त्यांच्यासाठी lot ची साईज आहे 68 यामध्ये 2176 शेअर्स व 10 लाख 11 हजार 840 इतके रकमेसाठी ते अप्लाय करू शकतात. तर कंपनीच्या आयपीओचे टोटल इशू साइज जी आहे ती आहे जवळपास 4193 कोटी 73 लाख आहे यामधील जो फ्रेश इशू म्हणजे कंपनीचे जे शेअर्स विक्रीला काढले जाणारे ते आहेत 1666 कोटी रुपयाचे तर यामधील ऑफर फॉर सेल म्हणजेच existing शेअर होल्डर आहे त्यांचा विक्रीचा जो हिस्सा आहे तो आहे जवळपास 2527 कोटी 73 लाख म्हणजेच ऑफर फॉर सेलची साईज ही जास्त आहे ही देखील एक नकारात्मक बाब बनता येईल तर कर्मचाऱ्यांसाठी 44 रुपये प्रति शेर इतका डिस्काउंट असेल.
ANCHOR INVESTMENT :
अँकर इन्व्हेस्टर्स म्हणजे मोठ्या वित्तीय व फंड्स कंपन्या आहेत ज्या अँकर इन्वेस्टमेंट साठी राखीव असलेल्या कोटा अंतर्गत कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात यावरून देखील आपल्याला ipo मध्ये असलेल्या मोठ मोठ्या कंपनीच्या कंपन्यांच्या गुंतवणूक बद्दल माहिती मिळते.Brainbees Solutions limited या कंपनीने अँकर इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून 1885 कोटी 80 लाख इतकी रक्कम मिळवली आहे. ज्यामध्ये 71 अँकर investment सहभागी होते ज्यांना 465 रुपये प्रति शेअर त्याची फेस व्हॅल्यू 2 रुपये प्रति शेअर इतके असून असे 4 कोटी 5 लाख 55 हजार 428 शेअर्स अलोकेट करण्यात आलेले आहेत. अँकरिंग वेस्ट मधील महत्त्वाच्या कंपन्यांचा जर विचार केला तर यामध्ये government of Singapore, monitary authority of Singapore ,government pension fund global ,Abu Dhabi investment authority, Nomura funds Ireland public limited company, SBI optimal equity fund , SBI Magnum children’s benefit fund , SBI consumption opportunities fund, ICICI prudential tax saver fund, HDFC mutual fund, Kotak Mahindra trusted ,SBI Life insurance ,Max Life, City group global ,Morgan Stanley इत्यादी दिग्गज कंपन्यांनी या आयपीएल मध्ये अँकर इन्व्हेस्टमेंट च्या माध्यमातून गुंतवणूक केल्याचे दिसत आहे.
मित्रांनो आयपीओ बद्दलची माहिती, सध्याचा कंपनीचा GMP व ईतर सर्व बाबी लक्षात घेता आयपीओ मध्ये गुंतवणूक करावी किंवा नाही त्याचबरोबर सध्या बाजारामध्ये असलेला दबाव या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. कंपनीच्या मार्केट लीडरशिपचा जर विचार केला तर कंपनी उत्तम प्रकारच्या ब्रँड असून या क्षेत्रामध्ये कंपनीची लीडरशिप आहे. कंपनी जरी तोट्यामध्ये असली तरी भविष्यामध्ये कंपनीला नफा कमावण्याची शक्यता देखील आहे. (Disclaimer :- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या आधीन असते . कुठल्याही प्रकारच्या गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा आम्ही कुठल्याही प्रकारच्या share खरेदी विक्रीचा सल्ला देत नाही)