मेडिक्लेम पॉलिसी :-
मेडिक्लेम पॉलिसी एक अशी योजना आहे ज्या अंतर्गत ज्या कंपनीकडे आपण ही पॉलिसी काढतो तेव्हा त्या कंपनीच्या मार्फत आपल्या आरोग्यावर होणाऱ्या कुठल्याही खर्चाची रक्कम जी पॉलिसी काढताना ठरलेली असते म्हणजेच आपण किती रुपयांचा विमा घेत आहेत त्या आधारे सर्व दवाखान्याचा खर्च विमाधारक कंपनी विमाधारकांतर्फे दवाखान्यासाठी दिला जातो. म्हणजेच हा एक असा करार आहे ज्यामध्ये एका निश्चित खर्चाच्या रकमेसाठी एक निश्चित प्रीमियम भरून त्या विम्याच्या कालावधीसाठी आपल्या आरोग्यावर होणारा सर्व खर्च (अर्थातच अटी शर्ती सह ) त्या विमाधारक कंपनी मार्फत दिला जातो.
कोण घेऊ शकतो ही पॉलिसी
कोणीही ही पॉलिसी घेऊ शकतो ज्यामध्ये तीन महिन्याच्या बालकांपासून ते 75 वर्षापर्यंतचे नागरिक ही पॉलिसी घेऊ शकतात. वयाची अट ही वेगवेगळ्या प्लॅन नुसार असते.लहान बालक आई वडिलांच्या पॉलिसीखाली कव्हर केले जातात.
मेडिक्लेम पॉलिसी चे प्रकार
तर या पॉलिसी अंतर्गत ज्यांचा विमा काढला जातो त्यानुसार या पॉलिसीचे दोन प्रकार आहेत
1)Individual policy/ वैयक्तिक विमा पॉलिसी
या प्रकारची पॉलिसी ही व्यक्तिगत पॉलिसी असते म्हणजेच एका व्यक्तीसाठी एक विशिष्ट पॉलिसी खरेदी केली जाते त्यामध्ये एखादी व्यक्ती वेगवेगळ्या कंपन्याकडून एकापेक्षा जास्त देखील पॉलिसी याप्रकारे खरेदी करू शकते. या पॉलिसी अंतर्गत फक्त एका व्यक्तीचा विमा काढला जातो. जर तुम्ही एखाद्या कंपनीकडून पाच लाख रुपयांचा विमा एका विशिष्ट प्रीमियम चा भरणा करून काही एका विशिष्ट म्हणजेच एक वर्षासाठी काढला असेल तर फक्त त्या व्यक्तीलाच त्या विम्याची रक्कम दवाखान्यातील खर्चासाठी मिळेल जर त्या व्यक्तीच्या घरातील इतर सदस्य असतील पण पॉलिसी जर इंडिविज्युअल असेल तर घरातील इतर सदस्यांना या पॉलिसीचा कुठलाही फायदा मिळणार नाही. यावरूनच एक व्यक्ती एक पॉलिसी असे हे धोरण असते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या घरातील सर्व सदस्यांना सर्वांना समान अशा ठराविक रकमेच्या विमा तिच्या संरक्षणाखाली आणावयाचे असल्यास त्यांच्यासाठी या प्रकारचा विमा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
2) Family flotar पॉलिसी / फॅमिली फ्लोटर पॉलिसी :
वर बघितलेल्या पॉलिसी पेक्षा उलट या पॉलिसीमध्ये असते. शब्दावरून आपल्या लक्षात येईल की पूर्ण कुटुंबाला एकाच प्रीमियम मध्ये विमा संरक्षण दिले जाते. त्यामध्ये संपूर्ण कुटुंबातील सगळ्या व्यक्तींमध्ये मिळून एकच प्रीमियम भरला जातो व चे संरक्षण मात्र कुटुंबातील सर्व व्यक्तींना मिळते. अर्थातच यामध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या निर्धारित असते निर्धारित संख्येपेक्षा अधिकचे सदस्य या पॉलिसी अंतर्गत विमा संरक्षित करता येत नाहीत. साधारणता किमान दोन आणि कमाल सहा इतके सदस्य या फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये जोडता येऊ शकतात. त्यांना दाखल समजायचे झाल्यास समजा, एका कुटुंबाने ठराविक प्रीमियम भरून पाच लाख रुपयांचा फॅमिली फ्लोटर प्लॅन घेतला आहे. तर आता या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावयाचे असल्यास पाच लाख रुपये पर्यंतचा उपराचा खर्च सदरील संबंधित विमा कंपनी ( अर्थातच त्यातच पूर्ण अटी व शर्तीसह ) पण त्याच वर्षामध्ये दुसऱ्या त्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यास मात्र याचा लाभ होणार नाही कारण आपण उदाहरणात बघितल्याप्रमाणे कुटुंबातील एका व्यक्तीने अगोदरच पूर्ण विम्याची रक्कम मिळवली आहे या फॅमिली फ्लोटर विमा योजनेचा एक तोटा आहे. म्हणजेच संपूर्ण कुटुंबात मिळून पाच लाख रुपयाचे सर्वेक्षण त्या कुटुंबाला मिळाले असे आपण म्हणू. अगोदर आपण जी व्यक्तिगत विमा पॉलिसी बघितली त्यामध्ये मात्र प्रत्येक सदस्यांना लाख रुपये असा विमा लागू होता त्यासाठी प्रत्येकाला वेगळा प्रीमियम भरावा लागत होता.
व्यक्तिगत विमा की फॅमिली फ्लोटर प्लॅन?
वरील उल्लेखलेल्या दोन प्रकार यापैकी कुठल्या प्रकारची विमा पॉलिसी घ्यायची हे आरोग्य विषयक समस्या, कुटुंबाचा आकार, आर्थिक बाजू यावर अवलंबून आहे. तुलनात्मक विचार केल्यास दोन्ही प्रकारच्या पॉलिसीमध्ये नेमका काय फरक आहे आपण बघूया.
- व्यक्तिगत पॉलिसी साठी अधिकचा प्रीमियम भरावा लागतो. तर आपण फॅमिली फ्लोटर प्लान घेतल्यास त्यापैकी पूर्ण कुटुंबाला मिळून तितकाच खर्च येतो यामध्ये प्रीमियमच्या बाबतीत फॅमिली फ्लोटर प्लान फायदेशीर ठरतो.
- व्यक्तिगत पॉलिसीमध्ये प्रत्येक व्यक्तीला तुम्ही विमा रकमेच्या काढलेल्या पूर्ण पैशाचे संरक्षण असते. इंडिव्हिज्युअल प्लान घेतला असेल प्रत्येक व्यक्तीच्या पाच लाखापर्यंतचा खर्च सदरील विमा कंपनी भरेल. या उलट फॅमिली फ्लोटर प्लान मध्ये तर तुम्ही पाच लाखाचा विमा काढला असेल तर संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित मिळून पाच लाख रुपये एवढे तुम्हाला संरक्षण मिळेल.
- त्या कुटुंबामध्ये आरोग्याच्या समस्या कमी प्रमाणात आहेत अशांसाठी फॅमिली फ्लोटर प्लान अधिक फायद्याचा ठरू शकतो.
मेडिक्लेम पॉलिसीचे फायदे
दवाखान्यामध्ये दाखल झाल्यानंतर उपचारासाठी होणाऱ्या खर्चासाठी संरक्षण प्राप्त होते. दवाखान्यामध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, डॉक्टरांची भेट,विविध मेडिकल तपासण्या , रूम चार्जेस, अनस्थेशिया, औषध गोळ्या इत्यादीचा खर्च विमा कंपनी करते अर्थातच प्लान नुसार खर्चाची तरतूद असते.
दुसरा फायदा म्हणजे कुठल्याही आरोग्य विम्याच्या प्रीमियमच्या रकमेवर आयकर मध्ये कलम 80 D नुसार 25000 पर्यंत सूट असते.जेष्ठ नागरिकांसाठी 50000 पर्यंत.
सर्वच आजारांवर विमा संरक्षण असते काय?
काय अंतर्भूत नसते?
काय अंतर्भूत असते किंवा काय अंतर्भूत नसते या गोष्टी विविध कंपन्या व त्या कंपनीचे प्लॅन यावर आवलंबुन असते. प्रसूती खर्चासाठी विमा संरक्षण मिळत नाही परंतू काही कंपन्या मार्फत प्रसूतीसाठी विशेष प्लॅन आहेत. त्याचबरोबर ज्या आजारावर घरच्या घरी उपचार केला जाऊ शकतो. दातांच्या सौंदर्यासाठी केला जाणारा खर्च. या आजारामध्ये तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट होण्याची आवश्यकता नसते अशा गोष्टींचा खर्च पॉलिसी काढल्यानंतर वेटिंग पिरियड च्या आत 30 दिवसांच्या आत (काही बाबतीत गैरलागू ) तुम्ही उपचार घेत असाल तर. विमा संरक्षित रकमेपेक्षा अधिकचा खर्च. यांसारख्या काही गोष्टी अंतर्भूत नसतात. याशिवाय प्री एक्सिस्टिंग डिसीजेस म्हणजेच जे आजार तुम्हाला पॉलिसी काढण्याचे अगोदरपासून आहे ते आजार ( काही बाबतीत प्रिय असिस्टंट डिसीजेस साठी वेटिंग पिरियड कालावधीनुसार लाभ मिळतो). बालकांचे वॅक्सिनेशन, निसरगोपचार यांसारख्या गोष्टी.
क्लेम करण्याची प्रक्रिया Claim Settlement process :
जर आपण एखाद्या कंपनीची विमा पॉलिसी घेतली असेल पूर्ण नियमांतर्गत आपण एखाद्या दवाखान्यामध्ये उपचार घेतला असेल व सदरील उपचार आपल्या विमा पॉलिसीच्या नियमांतर्गत पात्र असतील तर सदर खर्चाच्या क्लेमसाठी दोन प्रकारे दावा (claim) करू शकतो. विमा कंपन्या साधारणतः सर्व प्रक्रियेसाठी टीपीए TPA (Third Party Administrator) यांच्याद्वारे करतात. टी पी ए कंपन्या ह्या विमा कंपन्यांचे मध्यस्थी म्हणून काम करतात.
कॅशलेस Cashless :
विमा कंपनीच्या रुग्णालयाशी करारबद्ध आहेत अशा ठिकाणी कॅशलेस पद्धतीने विम्याचा दावा पूर्ण करू शकतो. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हॉस्पिटल मध्ये तुम्हाला तुमच्या पॉलिसी बद्दल माहिती विचारली जाते.सदरील विमा कंपनी संबंधित रुग्णालयाशी करारबद्ध ( Network hospitals)असेल तर टीपीएला तसं कळवलं जातं व तुमच्या दाव्यासाठी सदरील रुग्णालयामार्फत मंजुरीसाठी अर्ज केला जातो. जर पूर्ण नियमांतर्गत तुम्हाला कॅशलेस खर्चासाठी मंजुरी मिळाल्यास तुम्हांला त्या दवाखान्यामध्ये पॉलिसी रकमेपर्यंतचा झालेला खर्च सदर टीपीएमार्फत विमा कंपनी त्या रुग्णालयात तेथे यामध्ये तुम्हाला पैसे भरण्याची आवश्यकता नसते. अर्थातच नियम व अटींसह काही खर्चासाठी मंजुरी असते. विमा कंपनीच्या पॉलिसी नुसार काही खर्च स्वतःला करावा लागतो.
रेइंबर्समेंट / Reimbursement :
पण वर कॅशलेस पद्धतीमध्ये बघितलं की विमा कंपनीच्या रुग्णालयाशी करारबद्ध आहेत अशा ठिकाणी कॅशलेस पद्धतीने विम्याचा दावा पूर्ण करू शकतो. परंतु आपण तात्काळ क्षणी एखाद्या रुग्णालयात दाखल झालो आणि सदर रुग्णालयाचा तुम्ही पॉलिसी काढलेल्या कंपनीशी करार नसेल किंवा ते नेटवर्क हॉस्पिटल नसेल तर आपण रुग्णात दाखल झाले रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कंपनीला तसे कळवावे लागेल किंवा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर सर्व बिल्स व दवाखान्याची कागदपत्रे ही कंपनीने ठरवून दिलेल्या पद्धतीने क्लेम फॉर्म भरून आपण सदरील कंपनीने सांगितलेल्या पत्त्यावर पाठवू शकतो, अर्थातच ही सर्व प्रक्रिया एका ठराविक कालावधीतच करावी लागेल. त्यानंतर आपली कागदपत्रे मिळाल्यानंतर कंपनी आपल्या पूर्ण कागदपत्राच्या आधारे आपल्या रकमेच्या दाव्यावर कार्यवाही करते.
अशाप्रकारे मेडिक्लेम पॉलिसी आपल्याला इमर्जन्सी मध्ये होणारा दवाखान्यावरील खर्चापासून मुक्तता देऊ शकेल.
भारतातील काही नोंदणीकृत आरोग्य विमा कंपन्या :-
या आरोग्य विमा क्षेत्रातील कंपन्यांवर IRDAI – Insurance regulatory and Development authority of India चे नियंत्रण असते. भारतातील काही नामांकित नोंदणीकृत विमा सेवा पुरवणाऱ्या कंपन्या खालील प्रमाणे आहेत.
Galaxy Health and Allied Insurance Co. Ltd.
Aditya Birla Health Insurance Co. Ltd.
care Health Insurance ltd.
Narayana Health Insurance Ltd.
Manipal Cigma health ltd.
Niva Bupa Health Insurance ltd.
Star Health & Allied Insurance Co.Ltd.
National Insurance Co. Ltd.
ICICI Lombard General Insurance Co. Ltd.
Kotak Mahindra General Insurance Co. Ltd.
Liberty General Insurance Ltd.
Magma HDI General Insurance Co. Ltd.
Shriram General Insurance Co. Ltd.
United India Insurance Co. Ltd.
Go Digit General Insurance Ltd.
Bajaj Allianz General Insurance Co. Ltd.
Cholamandalam MS General Insurance Co. Ltd.
Bharti AXA General Insurance Co. Ltd.
HDFC ERGO General Insurance Co. Ltd.
Future Generali India Insurance Co. Ltd.
The New India Assurance Co. Ltd.
Iffco Tokio General Insurance Co. Ltd.
Reliance General Insurance Co. Ltd.
Royal Sundaram General Insurance Co. Ltd.
The Oriental Insurance Co. Ltd.
Tata AIG General Insurance Co. Ltd.
SBI General Insurance Co. Ltd.
Acko General Insurance Ltd.
Navi General Insurance Ltd.