मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने मोबाईल द्वारे भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावयाचे आहे.त्यानंतर सर्वप्रथम आपण आपला मोबाईल नंबर टाकून त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून लॉगिन करून तेथे महिलेची प्रोफाइल तयार करण्यासाठी संपूर्ण माहिती भरून प्रोफाइल तयार करावी.आणि नारीशक्ती प्रकार अनुसार नारी शक्ती प्रकारामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत विवाहित, अविवाहित, गृहिणी, पर्यवेक्षिका, ग्रामसेवकाचे विविध प्रकार आहेत तुम्ही गृहिणी किंवा सामान्य महिला यापैकी कोणते एक सिलेक्ट करून फॉर्म भरू शकतात आणि फॉर्म करू शकतात.
प्रोफाइल पूर्ण केल्यानंतर आपण होम पेज वरती जे अधिक चिन्ह (+) यावर क्लिक करा म्हणजे आपण डायरेक्ट माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर जाऊ आता योजनेचा आपल्याला हा फॉर्म आता भरायचा आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या इथे आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली दिलेल्या पद्धतीने आपल्यासमोर पूर्णपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा ओपन होत असतो.
आणि आता सविस्तर पणे हा फॉर्म मोबाईल द्वारे कसा भरायचा आहे हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया.
महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड महिलेच्या ज्या नावाने असेल त्याच नावाने आपल्याला येथे भरायचा आहे जर आधार कार्ड वरची आणि इतर डॉक्युमेंट वरची नावांमध्ये जर तफावत असेल तर बँक अकाउंट जर त्या नावाने नसेल तर सर्वप्रथम सर्व कागदपत्र अगोदर एका नावाने करा कोणतेही प्रकारची फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका. कारण म्हणजे हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला मुदत ही तब्बल दोन महिन्यांची आहे.म्हणजे 31 ऑगस्ट फॉर्म भरला तरी चालते.तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरण्यास कोणतीही अडचण असल्यास सर्व डॉक्युमेंट्स अगोदर तयार करा आणि त्यानंतरच फॉर्म भरा सर्वप्रथम बघायच आहे महिलेचे जे संपूर्ण नाव आहे ते आपल्याला नाव टाकायचे तेही नाव आधार कार्ड प्रमाणे टाकायचंय जस आधार कार्ड मध्ये नाव असेल तशा पद्धतीने टाका कोणतीही लँग्वेज तुम्ही वापरू शकता भाषा कोणतीही वापरू शकतात मराठी आणि इंग्रजी यापैकी जी भाषा तुम्हाला योग्य वाटेल ती भाषा तुम्ही वापरू शकतात तर ते झाल्यानंतर आधार कार्ड चे नाव टाकल्यानंतर इथे पतीचे नाव हे विचारलं आहे तुम्ही पतीचे नाव किंवा आपल्या वडिलांच्या नावाने जर मुलगी जर फॉर्म भरत असेल तर वडिलांचे नाव भरू शकते. तेथे महिलेचा पतीच्या नावाने फॉर्म भरला जाणार तर पतीचे नाव त्यानंतर विचारल जाते. महिलेचे लग्ना पूर्वीचे नाव? तर लग्नापूर्वीच नाव ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी आपलं लग्न पूर्वीचं नाव टाकायचं काही महिलांचे लग्नानंतर नाव बदललं जात त्यांनीही हा फॉर्म भरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आता विचारले जाते जन्मतारीख. आता 21 ते 65 वयापर्यंत महिला अर्ज करू शकणार आहेत तर त्यांनी आपली जन्मतारीख येथे निवडायचे आहे याचं पूर्ण वर्ष सिलेक्ट करायचं आहे. साल निवडा आणि ओके दाबल्यानंतर मग तुमच्याकडून पुढचा अर्ज भरता येईल. आता पुढे बघूया अर्जदाराचा पत्ता? आधार कार्ड प्रमाणे आणि इतर माहिती जी आधार कार्ड वरती पत्ता आहे तोच पत्ता तुम्हाला तेथे टाकायचा आहे तो पत्ता टाकल्यानंतर पुढे जिल्हा टाकायचा आहे.जिल्हा तुम्ही सिलेक्ट करायचा इथे तुमचा जो काही जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुमच्या तालुक्याची लिस्ट जनरेट होईल तालुका जो काही असेल तो तालुका तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तालुका सिलेक्ट केल्यानंतर पुढे गाव /शहराची माहिती तुम्हाला इथे टाईप करायची आहे. आता पुढे ग्रामपंचायत/ नगरपरिषद/ नगरपालिका हे पर्याय आपल्यासमोर येतात तर आपली जी काय ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल त्यानुसार आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपला पिन कोड टाकायचा आहे पिन कोड टाकल्यानंतर ते करायचंय त्यानंतर आपल्याला त्या महिलेचा सध्या स्थितीत वापरात असलेला मोबाईल नंबर आपल्याला द्यावयाचा आहे. ज्या घरामध्ये एकापेक्षा अधिक महिला लाभार्थी असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की त्यांनी मोबाईल नंबर देताना हा प्रत्येकाचा वेगवेगळा नंबर देण्याचा प्रयत्न करावा.
आता यानंतर आधार क्रमांक टाकून मग आपल्याला आपला फॉर्म पुढे भरायचा आहे. आता पुढे असं विचारलं जातं की तुम्ही शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक लाभाच्या योजनेचे लाभार्थी आहात का जसं की श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना ई. शासनाकडून मासिक स्वरूपात जे तुम्हाला पैसे मिळतात ते जर 1500 रुपये पेक्षा जर कमी मिळत असेल तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्फत तुम्ही फॉर्म भरू शकतात. जर तुम्हाला त्यापेक्षा जर जास्त पैसे मिळत असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू नका. त्याचं कारण म्हणजे फॉर्म तुमचा रिजेक्ट होईल. त्यानंतर महिलेची वैवाहिक स्थिती आहे ती भरायची आहे. यामध्ये सिलेक्ट करायचे जर मुलगी अविवाहित असेल तर आपण तिथे अविवाहित सिलेक्ट करून पुढे त्यानंतर ज्या महिलांचा जन्म जर महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर राज्यातील असेल, तर त्यांनी इथे होय सिलेक्ट करायचं आहे आणि होय सिलेक्ट केल्यानंतर परराज्याचा जे काही नाव आहे जे राज्य आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर आपल्यासमोर इथे विचारले जाते ते म्हणजे अर्जदाराच्या बँकेचा तपशील आता बँकेचा तपशील मध्ये आपल्याला काय काय द्यायचे बँकेचे पूर्ण नाव टाकायचे आहे. बँक खातेधारकाचे आपल्याला इथे नाव द्यायचे बँक खाते क्रमांक द्यायचा आहे.आयएफसी कोड द्यायचा आहे जे बँकेचे तुमच्या पासबुक वरती असणारे सर्व डिटेल्स आपल्याला इथे टाकायचे आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्याला त्यांचा आधार कार्ड ही लिंक असणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्हाला पैसे हे मिळणार नाहीत त्याचं कारण म्हणजे हे आधार बेस्ड पेमेंट या योजनेद्वारे होणार आहे. आता पुढे आधार कार्डचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे आता पुढ इथे आपल्याला आधार कार्ड चा फोटो अपलोड करताना तो दोन्ही बाजूचा अपलोड करायचा आहे तुम्ही गॅलरीमध्ये अगोदरच काढून ठेवलेला फोटो इथे अपलोड करू शकता किंवा तुमच्या मोबाईलच्या कॅमेरा मध्ये मध्ये लाईव्ह फोटो देखील अपलोड करू शकता. यासाठी तुम्ही दोन्ही बाजूचा फोटो अगोदर एकत्र करा नंतरच तो एकत्रितरित्या अपलोड करा म्हणजे तुम्हाला पुढच्या समस्या येणार नाहीत.तर आता तुमच्याकडे जे अधिवास पुरावा म्हणुन जि कागदपत्र असतील जे आपल्याला या अँप मध्ये दिलेले आहेत रेशन कार्ड असेल, मतदान ओळखपत्र, जन्माप्रमाण पत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी जे असेल ते तुम्ही देऊ शकता. तर आता पुढे बघूया उत्पन्न प्रमाणपत्र किंवा केसरी रेशन कार्ड जर उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं नसेल तर तुमच्या कडे असले तर पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. पुढे अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याची प्रिंट काढायचे आहे आणि इथून ते तुम्हाला अपलोड करायचे त्यानंतर वरील पद्धतीने आपल्याला आपल्या बँक पासबुक पहिले पेज अपलोड करायचे आहे. आता अर्जदाराचा फोटो काढण्यासाठीचा पुढचा पर्याय असेल. यासाठी आपण आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करा तो फ्रंट कॅमेरा किंवा बॅक कॅमेरा कुठलाही चालेल. याद्वारे आपण आपला फोटो इथे अपलोड करायचा आहे.त्यानंतर आपल्याला एक हमीपत्र scroll स्वरूपात येईल हे असं हमीपत्र हे एक्सेप्ट करायचं आहे. इथे हा फॉर्म हा सबमिट होईल. मित्रांनो सद्यस्थितीत या एप्लीकेशन वर मोठ्या प्रमाणात लोड असल्यामुळे आपण रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर हा फॉर्म भरला तर आपल्याला अडचण येणार नाही.