PPF खाते म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना आपल्या देशात केंद्र शासनाने 1968 साली आणली. या योजनेचा मुख्य उद्देश हा लोकांमध्ये बचतीची/गुंतवणूकीची भावना निर्माण करणे हा होता. पीपीएफ ही एक अशी गुंतवणुकीची योजना आहे ज्यामध्ये विविध करांमधील सवलती त्याचबरोबर फिक्स रिटर्न असलेला एक गुंतवणुकीचा पर्याय शासन उपलब्ध करून देते त्याचबरोबर पीपीएफ चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षितता. गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. म्हणजेच थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणतात त्याचप्रमाणे थोड्या थोड्या गुंतवणुकीतून एक मोठी रक्कम या योजनेतून आपण निर्माण करू शकतो.
किती गुंतवणूक करता येते?
पीपीएफ अकाउंट मध्ये आपण एका आर्थिक वर्षात किमान पाचशे रुपये तर कमाल एक लाख 50 हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतो. अर्थातच ती रक्कम या आर्थिक वर्षातील कुठल्याही दिवशी तुम्ही या खात्यामध्ये टाकू शकता यावर कुठल्याच प्रकारचे निर्बंध नाहीत. त्याचबरोबर जर तुमच्याकडे महिन्याला इन्कम असेल तर तुम्ही महिन्यालाही या अकाउंट मध्ये पैसे टाकू शकता ज्याची मर्यादा एक लाख 50 हजार पर्यंत असते. पाचशे रुपये तर आजकालच्या जगात कुणासाठीही जास्तीचे नाहीयेत मे महिन्याला पन्नास-पन्नास रुपये जरी भरले तरी सहज 500 ते 600 रुपये होऊन जातात. अर्थातच हे उदाहरण झालं.
व्याजदर :-
आत्ता सध्या 7.1% एवढा आपल्याला व्याजदर वार्षिक आहे. आपल्या केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयामार्फत दर तीन महिन्यांनी या व्याजदराचा आढावा घेतला जातो आणि जर त्यांना वाटलं तर हा व्याजदर ते वाढवतात किंवा किंवा स्थिर ठेवतात किंवा त्यामध्ये कमी सुद्धा करतात करतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात गेली घेतली पाहिजे की पीपीएफ चा व्याजदर हा वाढेलच असे नाही पण केंद्र शासनाच्या धोरणानुसार त्यामध्ये वाढ किंवा घट होत असते.पण हे अगदीच दर तिमाहीला वाढतच असेही नाही. जर आपण पाहिले की आपण आपली पैसे जर बँकांच्या एफडी मध्ये गुंतवले तर त्यावरील व्याजदर तुम्हाला माहित आहे जो आरबीआयच्या वित्तीय धोरणानुसार सतत बदलत असतो शिवाय बँकांच्या एफडी वरील व्याजाचा दर हा पीपीएफ अकाउंट च्या व्याजाच्या दरापेक्षा तुलनेने कमी आहे याशिवाय स्थिर देखील नाही. त्यामुळे पीपीएफ मधील गुंतवणुकीवर हा परतावा 7.1% इतका सध्या मिळतो. इथे एक गोष्ट अजूनही महत्त्वाची म्हणजे पीपीएफ मधील व्याजावर आपल्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही या उलट कुठल्याही बँकेतील एफडीवर मिळणाऱ्या व्याजावर मात्र आपल्याला टॅक्स भरावा लागतो हा सगळ्यात मोठा फायदा हा पीपीएफ अकाउंटचा आहे.
PPF अकाउंट कुठे व कसे सुरु करावे :-
जर तुम्हाला पीपीएफ मध्ये गुंतवणूक करायची असेल म्हणजेच ईपीएफ अकाउंट उघडायचे असेल, तर तुम्हाला दोन प्रकारे सुरु करता येतील. बऱ्याचशा लीडिंग बँकांमध्ये पीपीएफ खात्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये एसबीआय, ॲक्सिस बँक, icici बँक hdfc बँक यांसारख्या इतर बऱ्याच बँकांमध्ये व पोस्टमध्ये देखील पीपीएफ खात्यांची सुविधा उपलब्ध आहे. पिपीएफ खाते हे दोन प्रकारे उघडता येते एक म्हणजे ऑफलाईन आणि दुसरे म्हणजे ऑनलाइन. तर वरीलपैकी कुठल्याही बँकेमध्ये किंवा इतर ज्या बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे तिथे जाऊन आपण उपलब्ध पद्धतीने नुसार हे खाते सुरू करू शकतो. अर्थातच आपल्या बँकांच्या इतर खात्याप्रमाणेच पीपीएफ खात्यांचे सुद्धा पासबुक मिळत असते व ज्यामध्ये पीपीएफ खात्यावरील व्यवहाराचे नोंद केले जाते. अशा पद्धतीने आपण पीपीएफ खाते ओपन करू शकतो.
पीपीएफ चा कालावधी :-
पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी कधी होते व पीपीएफ खात्यामधील गुंतवणूक केलेले पैसे आपल्याला कधी काढता येतात हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. तर बँकांमधील इतर खात्यांप्रमाणेच तुम्ही हे पैसे कधीही काढू शकत नाही तर पीपीएफ खात्यात जमा झालेले रक्कम ही एका विशिष्ट कालावधीसाठी असते व त्या अगोदर हे पैसे काढता येत नाहीत हे या खात्याच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तर ईपीएफ खात्याचा गुंतवणूक कालावधी हा पंधरा वर्षाचा आहे. म्हणजेच आपण या खात्यामधील गुंतवलेले पैसे हे 15 वर्षांसाठी Lock-in असतात.15 वर्ष संपल्यानंतर पीपीएफ मधील झालेली गुंतवणूक काढू शकता. पीपीएफ मधील गुंतवणूक काही विशिष्ट रक्कम emergency कारणासाठी पाच वर्षे कालावधीनंतर देखील काढता येते त्यासाठी देखील काही नियम आहेत.
जेव्हा तुमच्या पी पी एफ खाते पंधरा वर्षे कालावधी पूर्ण करेल तेव्हा तुम्ही पूर्ण रक्कम एकत्रित रीत्या काढू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रकमेवर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कर भरण्याची आवश्यकता नसते हे या पीपीएफ खात्याचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला इतर कुठल्याही बँकांमधील एफडी किंवा आरडी सारख्या खात्याला मिळत नाही. जर एखाद्या वेळेस तुमच्या पीपीएफ खात्याला पंधरा वर्षे पूर्ण झाले आहेत आणि तुम्ही जर त्या खात्यातील पैसे विड्रॉवल केले नाहीत तर तुमचे खाते हे आपोआप रिन्यूअल होत असते. जर तुम्हाला हे खाते पुढेच ठेवायचे असेल तर तुम्हाला पुढचा देखील पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे आपण अजून पाच वर्षासाठी हे खाते लॉक इन करू शकतो. म्हणजेच पुढे हे खाते विसाव्या वर्षी मॅच्युअर होत असते. व विसाव्या वर्षी आपण या खात्यातील रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री काढू शकतो. यापुढे देखील जर तुम्हाला तुमचे खाते सुरू ठेवायचे असेल तर ते अजूनही पाच वर्ष कालावधीसाठी तुम्ही सुरू ठेवू शकता म्हणजेच आता तुमचे खाते हे 25 व्या वर्षी मॅच्युअर होईल. अशा पद्धतीने आपण प्रत्येक पाच पाच वर्ष कालावधीसाठी आपले खाते रिन्यूअल करू शकता.
अशा पद्धतीने मित्रांनो पीपीएफ खाते एक आपल्यासाठी चांगले गुंतवणुकीचे साधन ठरू शकते ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही त्याचबरोबर व्याजाचा दर देखील एक स्थिर प्रकारचा असतो.
( कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या )