महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी नुकतीच एक योजना आणलेली आहे त्या योजनेचे नाव “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” ही योजना आहे. अशाच पद्धतीची योजना मध्यप्रदेश या राज्यामध्ये शिवराज सिंग चव्हाण मुख्यमंत्री असताना त्या राज्यामध्ये लागू केलेली होती विशेष म्हणजे त्यानंतर ही योजना पूर्ण देशभरात गाजली. आता हीच योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागु करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना महिन्याला 1500/- रुपये भेटणार आहेत. ही जी योजना आहे, या योजनेचा जो काही शासन निर्णय आहे, 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने जारी सुद्धा केलेला आहे. तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना काय आहे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. आपणास माहिती आहेच महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या शासन निर्णयात लिहिलेले आहे की महाराष्ट्रातील महिला मुलींना सुविधा उपलब्ध करून चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना स्वावलंबी करणे आणि सशक्तीकरण करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. तर ही जी योजना आहे.
या योजनेला नेमकं कोण पात्र आहे, यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहेत, यासाठी अर्ज कुठे करायचा या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दर महिना त्यांच्या खात्यामध्ये 1500/- रुपये महाराष्ट्र सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करणार आहेत.
कोण आहेत पात्र लाभार्थी?
महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांचे वय 21 ते 60 वर्षे यामध्ये आहे या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्याचबरोबर या वयोगटातील विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटीत महिला हा निराधार महिला यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे.
- मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेसाठी पात्रता ही विवाहित विधवा घटस्फोटीत किंवा निराधार असावी.
- त्या महिलेचे वय 21 वर्षे पूर्ण झालेल्या असावे आणि साठ वर्षे होण्याचे बाकी असावे
- विवाहित विधवा घटस्फोटीत किंवा निराधार असावी.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलेचा बँक मध्ये अकाउंट असणं आवश्यक आहे काय
- त्या महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे.
या योजनेसाठी कोणते लाभार्थी अपात्र आहेत ?
योजनेला कोणत्या महिला पात्र नाहीत यासंदर्भात सुद्धा आपण माहिती घेऊया.
- त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लेखापेक्षा जास्त आहे आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्या कुटुंबातील महिला सुद्धा याच्यासाठी पात्र नाही
- त्याचबरोबर ज्या कुटुंबातील सदस्य हे शासकीय कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी आहेत आणि सरकारी योजनेचा लाभ घेतात ही सुद्धा कर्मचारी त्यांच्या महिला याच्यासाठी पात्र राहणार नाहीत.
- तसेच सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत जर एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर ती महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही म्हणजे
- त्या कुटुंबातील सदस्य हे खासदार, आमदार आहेत असे सुद्धा या महिला सुद्धा पात्र ठरणार नाहीत तर अशा पद्धतीने पात्र महिला कोणत्या आणि अपात्र महिला कोणत्या याचा संदर्भात सुद्धा शासन निर्णयामध्ये स्पष्टता दिलेली आहे.
ही कागदपत्रे आवश्यक आहेत :-
खालील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहे कारण महत्वाचं म्हणजे या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्र काय काय लागणार आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ते त्यातलं पहिलं कागदपत्र आहे की लाभार्थी
1) महिलेचा आधार कार्ड असणे आवश्यक आहे
2) या महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे म्हणजेच या महिलेकडे महाराष्ट्राचा अधिवास Domicile किंवा महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला दाखला असणे आवश्यक आहे.
3) लाभार्थी महिलेकडे उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे ज्यामध्ये असं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे . जर सदर महिलेचे वार्षिक उत्पन्न हे जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तीला या योजनेचा लाभ भेटणार नाही.
4) तसेच त्या महिलेचा बँक खातं असणं आवश्यक आहे त्या महिलेचा बँक खात्याच्या पहिल्या पानाची फोटो आवश्यक आहे
5) पासपोर्ट फोटो सुद्धा ऑनलाइन अर्ज करताना सोबत असणे आवश्यक आहे.
6) त्याचबरोबर रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे तर अशा पद्धतीने या योजनेत जे काही कागदपत्र लागणार आहेत हे शासन निर्णय मध्ये पूर्णपणे दिलेले आहेत.
लाभार्थी निवड/खातरजमा कोण करणार?
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभार्थिंची पात्रता अंगणवाडी
सेविका/पर्यवेक्षिका /मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र /ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांनी
खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अहधकारी यांनी या कामकाजावर सनियंत्रण ठेवावे. मा. जिल्हाधिकारी हे अंतिम मंजुरी देणे करीता सक्षम प्राधिकारी समितीचे अध्यक्ष असतील.
असा भरा ऑनलाईन फॉर्म :-
तुम्ही स्वतः सुद्धा ऑनलाईन अर्ज भरू शकता. तसेच हा फॉर्म भरायचा आपल्याला तिथे फॉर्म भरत असताना ती स्वतः महिला असणं आवश्यक आहे कारण तिचा थेट ऑनलाईन फोटो काढले जाणारे आणि ekyc सुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळे अर्ज भरत असताना लाभार्थी महिलाही तिथे उपस्थित असणं हे आवश्यक आहे तुम्ही अर्ज केल्यानंतर एका समितीच्या मार्फत तुमच्या अर्जाची शहानिशा करून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात प्रति महिना 1500/- रुपये टाकले जाणार आहेत
कधी सुरु होणार ऑनलाईन फॉर्म?
या योजनेच्या अर्ज हे एक जुलैपासून चालू होणार आहेत एक जुलै 2024 ते अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै आहे. 16 जुलै रोजी तात्पुरती यादी प्रकाशित केल्या जाईल त्यावर तुमच्या काही तक्रारी असतील तर त्याच्या नंतर त्याच्यावर हरकती असतील तर ते 16 जुलै ते 20 जुलै 2024 या कालावधीत तुम्हाला कळवायचे आहे.21 जुलै ते 30 जुलै या कालावधीत लाभार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण केली जाईल. 1 ऑगस्ट 2024 ला अंतिम यादी प्रकाशित केल्या जाईल. बँकेत ekyc करण्याचा अंतिम दिनांक हा 10 ऑगस्ट असेल. त्यानंतर दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थ्याच्या खात्यात थेट 1500/- रुपये वितरीत केले जातील त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला या निधीचे हस्तांतरण लाभार्थ्याच्या खात्यामध्ये होईल.