Trom Industries Limited असे या कंपनीचे नाव असून सर्वप्रथम आपण या कंपनी बदल जाणून घेऊया ही की , ही कंपनी ही कुठल्या क्षेत्रात काम करते व तिची आर्थिक कामगिरी ही कशा प्रकारची आहे. तर ही एक सोलार ईपीसी म्हणजेच इंजीनियरिंग प्रोक्यूमेंट आणि कन्स्ट्रक्शन या प्रकारची कंपनी असून ही कंपनी निवासी छतावर व औद्योगिक सौर ऊर्जा संयंत्र, जमिनीवर सौर ऊर्जा संयंत्र आणि सौर पथदिवे यामध्ये विशेष प्रकारचे काम या कंपनीचे आहे कंपनीच्या आर्थिक वर्ष 2024 मधील net प्रॉफिट जर बघितला हा 1885.2% ने वाढून पाच कोटी बहात्तर लाख रुपये इतका झाला आहे जो मागील वर्षी 28 लाख रुपये होता या कालावधीत कंपनीचा महसूल 126 टक्के इतका वाढून ५४ कोटी ५४ लाख रुपये इतका झाला आहे म्हणजेच मागील वर्षी महसूल हा 24 कोटी तेरा लाख इतका होता. म्हणजेच आर्थिक परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीचा आर्थिक परफॉर्मन्स हा खूप चांगला आहे. अँकर इन्व्हेस्टर च्या स्वरूपात या कंपनीमध्ये Chanakva Oonortunities Fund, Steptrade Revolution Fund, Perennial Emergins Growth Fund, VPK Global Ventures Fund – Scheme या कंपन्यांची गुंतवणूक आलेली आहे
25 जुलैपासून हा आयपीओ सुरू झालेला आहे तो 29 जुलैपर्यंत आपण या IPO साठी अप्लाय करू शकतो . तर या कालावधीत आपल्याला इन्वेस्टमेंट करण्यासाठी हा आयपीओ सुरू राहणारा असून सध्या केंद्र शासनाच्या धोरणांचा विचार जर केला तर सोलार क्षेत्रातील कंपन्यांसाठी सध्या सुगीचे दिवस असल्याचे आपल्या लक्षात येईल. इलेक्ट्रिक व्हेईकल्स असो किंवा रूफ टॉप सोलार असो किंवा विविध सोलार क्षेत्रातील अनुदान यांचा विचार केल्यास या प्रकारच्या कंपन्यांसाठी भविष्यात खूप मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर या प्रकारच्या कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक ही मल्टिबग्गर गुंतवणूक होण्याची शक्यता देखील आहे व त्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात नफा होण्याची शक्यता देखील आहे.25 जुलैपासून हा आयपीओ आपल्यासाठी ओपन झालेला आहे त्याच्यामध्ये 29 जुलैपर्यंत तुम्ही या ठिकाणी पैसे इन्वेस्टमेंट करू शकता.
Price band : या कंपनीच्या आयपीओ मध्ये गुंतवणुकीची प्राईस बँड आहे तर ती 100 ते 115 रुपये या प्रकारचा या कंपनीचा प्राईस बँड निश्चित केलेला आहे. म्हणजेच तुम्ही 100 ते 115 रुपये या दरम्यानच्या किमतीला या ipo साठी अप्लाय करू शकता. अर्थातच तुम्हाला इतक्या किमतीचे लॉर्ड्स खरेदी करावे लागतील जे निश्चित असतात या प्राईस बँड नुसार कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 105 ते 106 कोटीच्या दरम्यान असेल या आयपीओद्वारे कंपनी 131 कोटी रुपये उभारण्याची या कंपनीची योजना आहे आहे या ipo मध्ये नवीन शेअर्स लोकांना वितरित केले जातील या अंतर्गत एकूण 27 लाख 28 हजार नवीन शेअर्स विक्रीसाठी असतील.
Lot Size
या आयपीओच्या एका लॉटमध्ये जवळपास 1200 शेअर्स असतील म्हणजे एक लॉट हा 1200 शेअर्स आहे म्हणजेच किमान एक लाख 38 हजार रुपयाची किमान गुंतवणूक ही करावी लागेल ही किरकोळ म्हणजेच रिटेल इन्वेस्टर साठी गुंतवणूक आहे. यामध्ये रिटेल इन्वेस्टर हे किमान व कमाल एकच लॉट साठी अप्लाय करू शकतात.तर याचे HNIs म्हणजेच हाय नेटवर्थ इंडिविज्युअल या कॅटेगिरी साठी कमाल दोन लॉट साठी व किमान एका लॉट साठी अप्लाय करू शकतात.
IPO चा उद्देश
तर या आयपीओ द्वारे ही कंपनी जो निधी उभा करणार आहे, त्या कंपनीच्या निधीचा उद्देश आहे तो उत्पन्नाचा वापर नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी व वर्किंग कॅपिटल साठी या निधीचा वापर ही कंपनी करणार आहे व इतर सामान्य कार्पोरेट पर्पज साठी या निधीचा वापर ही कंपनी करणार आहे.
या आयपीओ संदर्भातील महत्त्वाच्या तारखा या खालील प्रमाणे आहेत
आयपीओ सुरु दिनांक | 25 जुलै 2024 |
शेवटचा दिनांक | 29 जुलै 2024 |
पैसे रिफंड होण्याचा दिनांक | 31 जुलै 2024 |
शेअर डिमॅट खत्यामध्ये क्रेडिट होण्याचा दिनांक | 31 जुलै 2024 |
शेअर Listing दिनांक | 1 ऑगस्ट 2024 |
(Disclaimer :- शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या आधीन असते.कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा. या लेखाचा उद्देश हा माहिती व शैक्षणिक दृष्टीकोनातून आहे. आम्ही कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला याद्वारे देत नाही )